​मुकेश खन्ना या कार्यक्रमाद्वारे पुन्हा ऐतिहासिक मालिकेकडे वळले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2016 04:48 PM2016-10-24T16:48:15+5:302016-10-24T16:48:15+5:30

सुज्योत वाधवा यांची पेशवा बाजीराव ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बाजीराव मस्तानी यांच्या आयुष्यावर असलेला बाजीराव-मस्तानी हा ...

Mukesh Khanna again turned to the historical series by this program | ​मुकेश खन्ना या कार्यक्रमाद्वारे पुन्हा ऐतिहासिक मालिकेकडे वळले

​मुकेश खन्ना या कार्यक्रमाद्वारे पुन्हा ऐतिहासिक मालिकेकडे वळले

googlenewsNext
ज्योत वाधवा यांची पेशवा बाजीराव ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बाजीराव मस्तानी यांच्या आयुष्यावर असलेला बाजीराव-मस्तानी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंग यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. या चित्रपटाच्या यशानंतर ही कथा प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मनिष वाधवा, अनुजा साठे, पल्लवी जोशी, रझा मुराद, नवाब शाह, संजय बत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेची स्टारकास्ट प्रचंड तगडी आहे. या तगड्या स्टारकास्टमध्ये आता आणखी एका अभिनेत्याची भर पडणार आहे. मुकेश खन्ना या मालिकेत ब्रम्हेद्र स्वामी ही व्यक्तिरेखा साकारणार असल्याची चर्चा आहे. यावर मुकेश खन्ना सांगतात, "मला मालिकेची ऑफर आली असली तरी मी याबाबत अद्याप विचार केलेला नाही. प्रोडक्शन हाऊससोबत चर्चा सुरू असून काही ठरल्यास मी लोकांना नक्कीच सांगेन." 
मुकेश खन्ना हे शक्तिमानच्या त्यांच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी महाभारत या मालिकेत भीष्मपितामह यांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. चंद्रकांता, द ग्रेट मराठा यांसारख्या ऐतिहासिक मालिकांमध्येदेखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. दरम्यानच्या काळात मर्यादा, प्यार का दर्द मीठा मीठा प्यारा प्यारा, वारिस यांसारख्या मालिकेत ते झळकले होते. पण या मालिकेतील त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा ते एतिहासिक मालिकेत पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: Mukesh Khanna again turned to the historical series by this program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.