'सौ. प्रताप मानसी सुपेकर' मालिकेनं गाठला १०० भागांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 08:11 PM2024-02-29T20:11:06+5:302024-02-29T20:11:20+5:30

Sau Pratap Manasi Supekar : 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' ने १०० भाग पूर्ण करुन एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. मालिकेच्या कलाकारांसाठी आणि संपूर्ण टीमसाठी हा एक उत्साहाचा क्षण आहे. या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण क्रू एकत्र जमले होते.

'Mrs. Pratap Manasi Supekar' serial reached the milestone of 100 episodes | 'सौ. प्रताप मानसी सुपेकर' मालिकेनं गाठला १०० भागांचा टप्पा

'सौ. प्रताप मानसी सुपेकर' मालिकेनं गाठला १०० भागांचा टप्पा

शेमारू मराठीबाणावरील लोकप्रिय मालिका 'सौ. प्रताप मानसी सुपेकर'(Sau Pratap Manasi Supekar)ने १०० भाग पूर्ण करुन एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. मालिकेच्या कलाकारांसाठी आणि संपूर्ण टीमसाठी हा एक उत्साहाचा क्षण आहे. या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी कलाकार आणि संपूर्ण क्रू एकत्र जमले. मालिकेच्या यशाबद्दल सगळ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्याने आणि वातावरण अधिक आनंदमयी झाले.

या मालिकेमध्ये मानसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी किरण आपला उत्साह व्यक्त करत म्हणाली, "आज आमची लाडकी मालिका 'सौ. प्रताप मानसी सुपेकर'साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अविस्मरणीय क्षण आणि मनापासून जोडलेल्या संबंधांनी भरलेला हा एक आनंददायी प्रवास आहे. आमच्या प्रेक्षकांचा अतूट पाठिंबा आणि त्याचबरोबर टीमचे समर्पण ही आमच्या यशामागील एक प्रेरक शक्ती आहे.  हे १०० एपिसोड प्रेम, हास्य, आणि उत्स्फूर्त कामाचे आहेत."

प्रतापची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रदीप घुलेने आपला आनंद व्यक्त केला, म्हणाला की, सौ. प्रताप मानसी सुपेकरचा प्रवास हा माझ्यासाठी अप्रतिम प्रवास ठरला आहे. आम्ही हा आनंदमयी टप्पा साजरा करत असताना, शो मधील पात्रांना जिवंत करण्याची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञतेने भारावून गेलो आहे. हा टप्पा गाठणं हे कलाकार आणि क्रू मधील समन्वयामुळे शक्य झाले आहे आणि त्याचबरोबर ते पडद्यावर देखील प्रतिबिंबित होते. दर्शकांनी जे अतूट प्रेम आणि समर्थन दिले त्याबद्दल त्यांचे आभार.
 

Web Title: 'Mrs. Pratap Manasi Supekar' serial reached the milestone of 100 episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.