केसात गजरा, नाकात नथ अन् कानात झुमके असा आहे मिसेस मुख्यमंत्रींचा मराठमोळा स्वॅग, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 03:00 PM2020-04-07T15:00:32+5:302020-04-07T15:01:18+5:30

मिसेस मुख्यमंत्रीमधील सुमीचा थाट पाहून व्हाल थक्क

MRS Mukhyamantri Fame Amruta Dhondage shared photos in Maharashtrian swag TJL | केसात गजरा, नाकात नथ अन् कानात झुमके असा आहे मिसेस मुख्यमंत्रींचा मराठमोळा स्वॅग, पहा फोटो

केसात गजरा, नाकात नथ अन् कानात झुमके असा आहे मिसेस मुख्यमंत्रींचा मराठमोळा स्वॅग, पहा फोटो

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील समर पाटील व खानावळीची मालकीण सुमी यांच्या प्रेमानं सगळ्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला आहे. या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. अमृताने नुकताच मराठमोळा लूक शेअर केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे. 

अमृताने नुकताच निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने कानात झुमके, चंद्राची कोर व नाकात नथ आणि केसात गजरा माळलेला दिसतो आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांची पसंती मिळते आहे.

झी मराठी वाहिनीवर मिसेस मुख्यमंत्री या मालिकाद्वारे अमृता धोंगडे घराघरामध्ये पोहोचली आहे. अमृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याआधी लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख मला ‘मिथुन’ या चित्रपटातून मिळाली.

अमृताने या मालिकेत भूमिका मिळालेल्या संधीबद्दल एका मुलाखतीत सांगितलं की, हा चित्रपट केल्यानंतर सर्व लक्ष पदवीच्या अभ्यासावर केंद्रित केलं होतं. त्यामुळे त्या काळात फार काम केलं नाही. परीक्षा झाल्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली.

खरं तर छोट्या पडद्यावर काम करण्याचा मी कधी विचार केला नव्हता. मात्र मालिकांत काम करण्याचा अनुभव घेऊन पाहू, असा विचार करून मी ऑडिशन दिली होती. त्यात माझी निवड झाली आणि मालिका मिळाली.

छोट्या पडद्यावर काम करणं तितकंच आव्हानात्मक आहे. मालिका प्रेक्षकांना रोज बघता यावी, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

ही मेहनत घेणं देखील मी छान एन्जॉय करत असल्याचं अमृता सांगते.

Web Title: MRS Mukhyamantri Fame Amruta Dhondage shared photos in Maharashtrian swag TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.