या सासू-सूनेची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:45 IST2016-11-09T17:45:17+5:302016-11-09T17:45:17+5:30
चंद्र-नंदिनी या मालिकेत मगधची राजकुमारी असलेल्या नंदिनीचे स्वयंवर लोकांना नुकतेच पाहायला मिळाले. यानंतर आता मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश ...

या सासू-सूनेची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार
च द्र-नंदिनी या मालिकेत मगधची राजकुमारी असलेल्या नंदिनीचे स्वयंवर लोकांना नुकतेच पाहायला मिळाले. यानंतर आता मालिकेत एका नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. या मालिकेत हेलेना ही नवी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून ती चंद्रगुप्त मौर्यच्या पत्नींपैकी एक दाखवली जाणार आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तरन्नूम साकारणार आहे. तिने या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली. या मालिकेत ती पपिया सेनगुप्ताच्या सूनेच्या भूमिकेत दिसणार आहे. पपिया आणि तरन्नूम यांनी याआधीदेखील एका मालिकेत एकत्र काम केले होते. ये कहा आगये हम या मालिकेत त्या दोघी झळकल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्या दोघींनी या मालिकेत सासू-सूनेची भूमिका साकारली होती आणि पुन्हा एकदा त्या सासू-सूनेच्याच भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पपियाच्याच सूनेची भूमिका साकारायला मिळत असल्याने तरन्नूमचा आनंद गगनात मावत नाहीये. याविषयी तरन्नूम सांगते, "पपिया पुन्हा एकदा माझ्या सासूची भूमिका साकारत आहे यामुळे मी खूपच खूश आहे. हा केवळ एक योगायोग आहे असेच म्हणावे लागेल. ती अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत असल्याने मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळते. आम्ही दोघींनी याआधीदेखील एकत्र काम केल्याने आमच्या दोघांची केमिस्ट्री खूपच चांगली जमली आहे. या मालिकेत मी साकारत असलेली हेलेन ही भूमिका खूप महत्त्वाची असून नंदिनी आणि चंद्रगुप्त यांच्या आयुष्यात हेलेन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे."
![]()