लग्नाच्या एक महिन्यात या अभिनेत्याच्या नात्यात आला दुरावा?, यावर आता त्याने दिली ही प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:49 PM2021-07-19T16:49:11+5:302021-07-19T16:49:35+5:30

पांड्या स्टोर मालिकेतील अभिनेत्याचे १९ जून रोजी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न झाले.

In a month of marriage, the actor's relationship came to an end ?, this is the reaction of the actor | लग्नाच्या एक महिन्यात या अभिनेत्याच्या नात्यात आला दुरावा?, यावर आता त्याने दिली ही प्रतिक्रिया

लग्नाच्या एक महिन्यात या अभिनेत्याच्या नात्यात आला दुरावा?, यावर आता त्याने दिली ही प्रतिक्रिया

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका पांड्या स्टोरमधील अभिनेता अक्षय खरोडियाने १९ जून रोजी त्याची गर्लफ्रेंड दिव्या पुनेठासोबत विवाह केला. नुकतेच त्यांच्या लग्नाला एक महिना झाला आहे. दरम्यान अक्षय खरोडियाने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ही पोस्ट पाहून अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.

अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सर्वांना धक्का बसला आहे. त्याने या पोस्टमध्ये ‘एक मोहब्बत थी’ असे म्हटले आहे. त्यासोबतच हॅशटॅगचा वापर करत हार्टब्रोकन असेही लिहिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टवरुन लग्नाच्या महिनाभरातच अक्षय आणि दिव्या यांच्या नात्यात कटुता तर आली नाही ना असे म्हटले जात आहे.


अक्षयच्या पोस्टवर उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे. दरम्याने त्याने इंस्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, ही फेक न्यूज आहे. हे फक्त गाण्याचे प्रमोशन होते. माझ्या खासगी आयुष्यात काहीच चुकीचे घडलेले नाही. मी आणि दिव्या एकत्रच आहोत.


अक्षय खरोडियाने १९ जून रोजी देहरादून येथे दिव्यासोबत लग्न केले. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे त्यांच्या लग्नाला केवळ १० लोकांनी हजेरी लावली होती.

लग्नातील अक्षय आणि दिव्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अक्षयने त्याच्या व्हायरल होणाऱ्या वृत्तांना अखेर पोस्ट शेअर करत पूर्णविराम लावला आहे.

Web Title: In a month of marriage, the actor's relationship came to an end ?, this is the reaction of the actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.