'नजर'मधील आपल्या सहकाऱ्याची मोनालिसाने घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:52 PM2018-08-23T16:52:10+5:302018-08-23T16:53:44+5:30

'नजर' ही मालिका अमानवी शक्तींच्या विषयावर असून तिची कथा आधुनिक भारतात घडते. पण त्यात केवळ अमानवी आणि दुष्ट शक्ती यांच्याच कथा नसून त्यात प्रणय आणि कौटुंबिक नात्यांची कथाही गुंफलेली आहे. 

Monalisa plays a prank on her Nazar co-star | 'नजर'मधील आपल्या सहकाऱ्याची मोनालिसाने घेतली फिरकी

'नजर'मधील आपल्या सहकाऱ्याची मोनालिसाने घेतली फिरकी

googlenewsNext
ठळक मुद्देमोनालिसा खऱ्या जीवनात मिश्कील आणि खट्याळ स्वभावाची मोनालिसाने हर्षची केली चेष्टा

स्टार प्लसवरील 'नजर' मालिकेत मोहना या डायनची भूमिका रंगविणारी भोजपुरी रूपसुंदर अभिनेत्री मोनालिसा ही खऱ्या जीवनात एक मिश्कील आणि खट्याळ स्वभावाची तरुणी आहे. मालिकेतील आपल्या भूमिकेप्रमाणेच वास्तव जीवनातही तिला इतरांची मस्करी करून त्यांना घाबरवून सोडायला आवडते.


मोनालिसाला त्या दिवशीही चित्रीकरणाच्या प्रदीर्घ वेळापत्रकाचा भार काहीसा हलका करण्यासाठी आपला सहकलाकार हर्ष राजपूत याची फिरकी घेण्याची लहर आली. मोनालिसा सांगते, 'मला सेटवर लोकांची, विशेषत: हर्षची चेष्टा करायला फार आवडते. चित्रीकरण सुरू असताना मी सेटवरील दिवे बंद करायला लावले आणि नंतर मी हर्षच्या मागे उभी राहिले आणि मलिकेतील माझ्या डायनचे भेसूर हास्य केले. ते ऐकताच तो प्रचंड दचकला आणि त्याने मागे कोण आहे, ते न बघताच पुढे लगबगीने चालायला सुरुवात केली. जेव्हा दिवे लावले गेले तेव्हा हर्षला कळले की मीच त्याच्या
मागे होते आणि मी त्याची चेष्टा केली होती ते.'
मालिकेत ती कितीही भीतीदायक वाटू दे. ती असेल, तेव्हा सेटवरील वातावरण जिवंत असते आणि वास्तव जीवनात तीच सर्वांना खदखदून हसवत असते. अशी मौजमजेची आवड असलेली ही डायन मालिकेत हर्षची आई झाली असून त्यामुळेच तो दावंश म्हणजेच अर्धा मनुष्य, अर्धा पिशाच्च बनला आहे. आता त्याचा विवाह अशाच एका डायनशी, रूबीशी लावून देण्याचा तिचा प्रयत्न आहे ज्यामुळे मोहना पुन्हा जिवंत होऊ शकेल.
'नजर' ही मालिका अमानवी शक्तींच्या विषयावर असून तिची कथा आधुनिक भारतात घडते. पण त्यात केवळ अमानवी आणि दुष्ट शक्ती यांच्याच कथा नसून त्यात प्रणय आणि कौटुंबिक नात्यांची कथाही गुंफलेली आहे. 

Web Title: Monalisa plays a prank on her Nazar co-star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nazarनजर