‘सख्या रे’ मालिकेला मोनाली ठाकूरचा स्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 13:26 IST2017-01-04T19:01:17+5:302017-01-06T13:26:15+5:30

सध्या हिंदी सिनेमासृष्टीतील बरेचसे गायक मराठीतील मालिकांचे शीर्षक गीत गात आहेत. त्या यादीत आता मोनाली ठाकूरचाही समावेश झाला आहे. ...

Monali Thakur's voice to 'Sakha Ray' | ‘सख्या रे’ मालिकेला मोनाली ठाकूरचा स्वर

‘सख्या रे’ मालिकेला मोनाली ठाकूरचा स्वर

्या हिंदी सिनेमासृष्टीतील बरेचसे गायक मराठीतील मालिकांचे शीर्षक गीत गात आहेत. त्या यादीत आता मोनाली ठाकूरचाही समावेश झाला आहे.  

‘मोह मोह के धागे, सवार लू’ असं म्हणत संपूर्ण भारताला वेड लावणारी गायिका मोनाली ठाकूर  मराठी गाण्याकडे वळली आहे. हिंदी सिनेमासृष्टीत एकापेक्षा एक सुपरिहट गाणी गायल्यानंतर मोनालीने आता  ‘सख्या रे’ मालिकेचे शीर्षक गीत गायिले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हिंदीतील आघाडीची गायिका शाल्मली खोलगडे हिने ‘चाहूल’ या मालिकेचे शीर्षक गीत गायिले होते, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्याचबरोबर बॉलिवूडची आघाडीची गायिका श्रेया घोषाल हिने ‘फुलपाखळी खुले ना’ हे गीत गाऊन मराठी प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. 

आता श्रेया घोषाल आणि शाल्मलीच्या पाठोपाठ मोनाली ठाकूरचा आवाज मराठी मालिकाविश्वात काय कमाल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान मराठी गाण्यासाठी मोनाली उत्साहित असून, या गाण्यासाठी तिने विशेष तयारी केल्याचे समजते. मोनालीने हिंदीमध्ये अनेक हिट गीत गायिले आहेत. ‘दम लगा के हयशा’ या सिनेमातील ‘मोह मोह के धागे’ या सुपरहिट गाण्यासाठी तिला राष्टÑीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर आयफामध्येही तिने बºयाचसे अवॉडर्स आपल्या नावावर केले आहेत. 

आता ती मराठीत गाणार असल्याने प्रेक्षकांनाही तिच्या आवाजाची प्रतिक्षा आहे. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना त्यांचा लाडका अभिनेता सुयश टिळक, रुची सवर्ण आणि निवोदित ज्ञानदा रामतीर्थकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी हे प्रमुख भूमिकेत दिसतील. मालिकेच्या शिर्षक गीताला मोनालीचा आवाज हेही प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरेल यात शंका नाही. 

Web Title: Monali Thakur's voice to 'Sakha Ray'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.