​कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी मोहित मलिक गिरवतोय गायनाचे धडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 15:50 IST2018-03-09T10:20:12+5:302018-03-09T15:50:12+5:30

‘स्टार प्लस’वर ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात ...

Mohit Malik is gearing up for the series of Kulfi kumar Bajajwala song lessons! | ​कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी मोहित मलिक गिरवतोय गायनाचे धडे!

​कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी मोहित मलिक गिरवतोय गायनाचे धडे!

्टार प्लस’वर ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात वर्षांच्या मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून अत्यंत सुरेल आणि गोड गळ्याची तिला देणगी लाभलेली आहे. कुल्फी ही आपल्या गोड आवाजाने निराश किंवा दु:खी प्रसंगाचे रूपांतर नेहमीच आनंद आणि सकारात्मक वातावरणात करते.
कुल्फी ही अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा अवतारात कुल्फी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना आपल्याला दिसणार आहे.  कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेद्वारे तब्बल तीन वर्षांनंतर मोहित मलिक छोट्या पडद्यावर परतणार आहे. या आगामी मालिकेतील आपल्या संगीतमय भूमिकेने प्रेक्षकांची मने काबीज करण्यास मोहित सज्ज झाला आहे. आपल्या सहज आणि नैसर्गिक अभिनयाबद्दल प्रसिद्ध असलेला मोहित ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेत सिकंदर या यशस्वी रॉकस्टारची भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी तो सध्या गायनाचे धडे देखील घेत आहे. त्याची भूमिका ही ग्लॅमरस आणि रॉकस्टारची आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण भूमिका रंगविण्यास उत्सुक झालेला मोहित सांगतो, “माझी व्यक्तिरेखा रंगतदार असून मी अशी भूमिका पूर्वी कधीच साकारलेली नाही. मालिकेत मी पडद्यावर गाताना दिसणार असून त्याबद्दल मी खूपच उत्सुक आहे. ही भूमिका वास्तववादी साकारण्याचा मी निर्धार केला होता आणि म्हणूनच त्यासाठी मी सध्या गायनाचे धडे घेत आहे.”
कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत सात वर्षांच्या कुल्फीची व्यक्तिरेखा आकृती शर्मा साकारणार आहे. या मालिकेत मोहित मलिकसोबतच अंजली आनंद, पल्लवी राव,  मेहुल बुच आणि श्रृती शर्मा असे अनेक नामवंत कलाकार प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेसाठी काही गाण्यांची खास निर्मिती देखील करण्यात आली आहेत. तसेच या मालिकेद्वारे इक्बाल खान, अपरा मेहता हे कलाकार देखील छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 

Also Read : कुल्फीकुमार बाजेवाला फेम आकृती शर्माला भेटायचे आहे माधुरी दीक्षित आणि हेमा मालिनीला



Web Title: Mohit Malik is gearing up for the series of Kulfi kumar Bajajwala song lessons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.