ये है मोहोब्बते या मालिकेची टीम रवाना झाली बूडापेस्टला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 11:04 IST2017-10-26T05:31:45+5:302017-10-26T11:04:57+5:30
ये है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी तर ...
ये है मोहोब्बते या मालिकेची टीम रवाना झाली बूडापेस्टला
य है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील रमण आणि इशिताची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तसेच या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेने आजवर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून लीपनंतर या मालिकेच्या कथानकात अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मालिकेने लीप घेतल्यानंतर ये है मोहोब्बते या मालिकेचे चित्रीकरण भारतात नव्हे तर परदेशात केले जाणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण आता बूडापेस्टमध्ये होणार असून या मालिकेतील काही कलाकार चित्रीकरणासाठी बूडापेस्टला रवाना देखील झाले आहेत. विवेक दहिया, अनिता हंसनंदानी, करण पटेल, दिव्यांका त्रिपाठी हे मालिकेतील कलाकार बूडापेस्टला गेले आहेत. विवेक दहिया आणि दिव्यांका त्रिपाठी खऱ्या आयुष्यात पती-पत्नी आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही ट्रीप खूप खास असणार आहे. बूडापेस्टला या टीमसोबतच करण पटेलची पत्नी अनिता भार्गवा आणि अनिता हंसनंदानीचा पती रोहित रेड्डी देखील गेले आहेत. त्यामुळे यांच्यासाठी हे चित्रीकरण म्हणजे एक ट्रीपच असणार आहे.
विवेक दहिया आणि अनिता हंसनंदानी यांनी विमानातले, विमानतळावरचे आणि बूडापेस्टमधले काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमधून चित्रीकरणासोबतच हे सगळे किती मजा मस्ती करत आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे. या चित्रीकरणासाठी ये है मोहोब्बते या मालिकेची निर्माती एकता कपूर देखील बूडापेस्टमध्ये दाखल झाली आहे.
स्टार प्लसवरील सर्वांची आवडती मालिका ये है मोहोब्बतें आता आंतरराष्ट्रीय बनणार असून ही मालिका आता दीड वर्षांचा लीप घेणार आहे. लीप नंतरच्या सुरुवातीच्या काही भागांचे चित्रीकरण बुडापेस्टमध्ये होणार असून आता या मालिकेत काही नवीन व्यक्तिरेखा सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ये है मोहोब्बते ही मालिका वर्षभरापूर्वीच लीप घेणार होती. पण काही कारणास्तव लीप घेण्याचे पुढे ढकलण्यात आले होते. आता या मालिकेत लीप घेण्यात यावा हा निर्णय प्रॉडक्शन हाऊस आणि वाहिनीने एकत्रित रित्या घेतला आहे.
Also Read : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया युरोपमध्ये सेलिब्रेट करताहेत लग्नाचा पहिला वाढदिवस