​ढाई किलो प्रेमसाठी मेहेरझान माझदाने वाढवले दोन महिन्यात 16 किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 10:36 AM2017-03-22T10:36:57+5:302017-03-22T16:06:57+5:30

ढाई किलो प्रेम या मालिकेत प्रेक्षकांना एक आगळीवेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. ही प्रेमकथा दोन इन्परफेक्ट लोकांची असून त्यांचा ...

Meezan extended for two and a half kilos of love and weighed 16 kg in two months | ​ढाई किलो प्रेमसाठी मेहेरझान माझदाने वाढवले दोन महिन्यात 16 किलो वजन

​ढाई किलो प्रेमसाठी मेहेरझान माझदाने वाढवले दोन महिन्यात 16 किलो वजन

googlenewsNext
ई किलो प्रेम या मालिकेत प्रेक्षकांना एक आगळीवेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहेत. ही प्रेमकथा दोन इन्परफेक्ट लोकांची असून त्यांचा आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन हा अतिशय वेगळा आहे. या मालिकेत पियुष आणि दिपिका अशा जोडप्याची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पियुष ही भूमिका या मालिकेत मेहेरझान माझदा तर दिपिका ही भूमिका अंजली आनंद साकारत आहे. मेहेरझानने आतापर्यंत निशा और उसके कझिन्स, लव्ह का द एन्ड, सेव्हन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण ढाई किलो प्रेम या मालिकेत त्याचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या मालिकेत पियुष हा अतिशय जाडजुड दाखवला जाणार असल्याचे ही मालिका सुरू व्हायच्याआधीच ठरले होते. त्यामुळे या मालिकेसाठी मेहेरझान माझदाने अनेक किलो वजन वाढवले आहे. मेहेरझानने वजन वाढवून तो बेढब दिसला पाहिजे याची मालिकेच्या टीमने काळजी घेतली आहे. त्यामुळे मेहेरझानला या मालिकेसाठी 16 किलो वजन वाढवावे लागले. यासाठी त्याने बिनधास्तपणे त्याच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारला. एवढेच नव्हे तर यासाठी जिममध्ये मस्क्युलर वेट ट्रेनिंग केले. इतके वजन वाढवणे हे मेहेरझानसाठी अतिशय कठीण गोष्ट होती. याविषयी तो सांगतो, "या मालिकेचे कथानक मला आवडल्यामुळे मी ही मालिका करण्याचे ठरवले. अनेक कलाकार आपला फिटनेस राखण्यासाठी डाएट करत असतात. पण मी वजन कमी करण्याच्या नव्हे तर वजन वाढवण्याच्या डाएटवर होतो. या मालिकेसाठी मी केवळ दोन महिन्यात तब्बल 16 किलो वजन वाढवलेले आहे." 



Web Title: Meezan extended for two and a half kilos of love and weighed 16 kg in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.