​राम कपूर आणि साक्षी तन्वर या मालिकेद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 17:29 IST2016-12-15T17:29:38+5:302016-12-15T17:29:38+5:30

बडे अच्छे लगते है या मालिकेत साक्षी तन्वर आणि राम कपूर यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. खरे तर ...

A meeting of the audience that will be played through the series Ram Kapoor and Sakshi Tanwar | ​राम कपूर आणि साक्षी तन्वर या मालिकेद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीस

​राम कपूर आणि साक्षी तन्वर या मालिकेद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीस

े अच्छे लगते है या मालिकेत साक्षी तन्वर आणि राम कपूर यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. खरे तर साक्षी आणि रामची जोडी पाहाताच क्षणी प्रेक्षकांना विजोड वाटली होती. पण या दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मन जिंकले. ही जोडी त्यावेळी प्रेक्षकांची सगळ्यात लाडकी जोडी बनली होती. 
बडे अच्छे लगते है ही मालिका बालाजी टेलिफ्लिम्सची होती. आता पुन्हा एकदा बालाजी टेलिफ्लिम्ससाठीच हे दोघे एकत्र येणार आहेत. पण यावेळी ते दोघे कोणत्या मालिकेत नव्हे तर वेब सिरिजमध्ये एकत्र काम करणार आहेत. कहते है अपोझिट्स अटरॅक्ट या वेब सिरिजमध्ये प्रेक्षकांना पुन्हा त्यांची जोडी पाहायला मिळणार असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या वेब सिरिजच्या निमित्ताने राम आणि साक्षीचा एक व्हिडिओ युट्युबला अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राम माझ्या जोडीदाराला मी लवकरच तुमच्यासमोर आणणार असे बोललो होतो आणि ते वचन मी पूर्ण केले आहे असे त्याच्या फॅन्सना सांगतो. त्यावेळी साक्षी तिच्या तोंडावर उशी घेऊन बसलेली दिसते आणि त्यानंतर ही उशी बाजूला करून राम त्याच्या या नायिकेला लोकांना इंट्रोड्युज करून देतो. साक्षीचा या व्हिडिओतील लूक खूप वेगळा आहे. हा लूक कोणत्या गोष्टीसाठी आहे हे कळण्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल असे ते दोघे या व्हिडिओत त्यांच्या फॅन्सना सांगत आहेत. हा व्हिडिओ खूपच छान असून तुम्हीदेखील तो नक्कीच पाहा. 





Web Title: A meeting of the audience that will be played through the series Ram Kapoor and Sakshi Tanwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.