म्हणून 'माझ्या नवऱ्याची बायको'मालिकेच्या सेटवर झाले सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 14:46 IST2018-08-23T14:41:26+5:302018-08-23T14:46:30+5:30
घरवाली आणि बाहरवाली यांना सांभाळता सांभाळता गॅरीची उडणारी धावपळ, गोंधळ रसिकांना चांगलीच भावते. तर राधिका आणि शनायाची जुगलबंदी तर रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे. गुरु, राधिका आणि शनायासह मालिकेतील इतर व्यक्तीरेखासुद्धा तितक्याच खास आहेत.

म्हणून 'माझ्या नवऱ्याची बायको'मालिकेच्या सेटवर झाले सेलिब्रेशन
छोट्या पडद्यावरील माझ्या नव-याची बायको मालिकेतील गुरुनाथ म्हणजेच गॅरी अर्थातच अभिनेता अभिजीत खांडकेकर. राधिका आणि शनायाच्या कात्रीत अडकलेला गॅरी अभिजीतने मोठ्या खुबीने रंगवला आहे. घरवाली आणि बाहरवाली यांना सांभाळता सांभाळता गॅरीची उडणारी धावपळ, गोंधळ रसिकांना चांगलीच भावते. तर राधिका आणि शनायाची जुगलबंदी तर रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे. गुरु, राधिका आणि शनायासह मालिकेतील इतर व्यक्तीरेखासुद्धा तितक्याच खास आहेत.
‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. सबंध महाराष्ट्रातील तमाम जनतेने डोक्यावर उचलून धरलेल्या या लोकप्रिय मालिकेने नुकतंच २ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला.
या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर मालिकेच्या २ वर्षपूर्तीसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. मालिकेतील कलाकार ऑफस्क्रीन देखील तितकीच धमाल करतात. त्यांनी हा आनंद केक कापून साजरा केला. त्यांची ऑनस्क्रीन मस्ती चाहते त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंट्सवर पाहतात. गुरुनाथ, रेवती आणि गुप्ते यांचे म्यूजिकली व्हिडीओजना देखील चाहते तितकेच आवडीने बघतात. सध्या मालिकेत राधिकाने ए.एल.एफ. कंपनीला टेकओव्हर करून कंपनीची सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेतली आहेत.
गुरुनाथ आणि शनाया त्याच कंपनीत काम करत असून राधिका त्यांना चांगलाच धारेवर धरत आहे. आता राधिका गुरुनाथ आणि शनायाला धडा शिकवण्यासाठी त्यांना कसं तिच्या तालावर नाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. या मालिकेने २ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि अजून पुढे देखील अशीच करत राहील यात शंकाच नाही.