दिवाळीसाठी मयुरी देशमुखची फुलऑन शॉपिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 15:22 IST2017-10-16T09:52:10+5:302017-10-16T15:22:10+5:30
छोट्या पडद्यावरील खुळता कळी खुलेना या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला आहे. मालिकेने निरोप घेतला असला तरी या मालिकेतील लोकप्रिय ...

दिवाळीसाठी मयुरी देशमुखची फुलऑन शॉपिंग!
छ ट्या पडद्यावरील खुळता कळी खुलेना या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला आहे. मालिकेने निरोप घेतला असला तरी या मालिकेतील लोकप्रिय कलाकार आजही रसिकांच्या मनात घर करुन आहेत. या मालिकेत अभिनेत्री मयुरी देशमुख हिने मानसी ही भूमिका साकारली होती. मयुरीने साकारलेली मानसी घराघरातील रसिकांची लाडकी बनली होती. या मालिकेतील मानसीचा अभिनय रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता. या मालिकेत सरळ साध्या स्वभावाची असणारी मानसीचा मालिकेतील लूक तितकाच सिंपल असा होता. रिअल लाइफमध्ये मात्र मानसी म्हणजेच मयुरी देशमुख ही फॅशनबाबत सजग आहे. दिवाळीसाठी प्रत्येकजण विशेष तयारी करत असतो. खासकरुन दिवाळीसाठी प्रत्येकजण नवनवीन कपड्यांची शॉपिंग करतो. मग यांत सेलिब्रिटीसुद्धा कसे मागे राहतील. अभिनेत्री मयुरी देशमुखसुद्धा दिवाळीच्या तयारीत बिझी झाली आहे. नुकतंच तिने दिवाळीसाठी खास शॉपिंग केली. त्यासाठी मयुरीने ग्लिटर एक्झिबिशनची निवड केली. खुलता कळी खुलेना मालिकेत पारंपरिक ड्रेसमध्ये दिसणा-या मयुरीने दिवाळीसाठी विविध प्रकारच्या कपड्यांची शॉपिंग केली. नववधूच्या स्टाईलमधील खास डिझायनर कपडे तिने खरेदी केली. आकर्षक अशा डिझायनर ड्रेसवर त्याला साजेसे दागदागिने तर हवेत. मग काय मयुरीने दिवाळीसाठी झक्कास आणि तितकीच आकर्षक अशी ज्वेलरी खरेदी केली. खास डिझायनर ड्रेस आणि आकर्षक दागदागिने अशा अंदाजात मयुरीचा लूक कुणालाही घायाळ करेल असाच होता. मयुरीने सीएनएक्स लोकमतसाठी टॅगर्सच्या मदतीने ही फुल ऑन दिवाळी शॉपिंग केली.
'खुलता कळी खुलेना' मालिका मोनिका-विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तीरेखांभोवती या मालिकेचे कथानक फिरत होते. अल्पावधीतच या मालिकेने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली. या मालिकेच्या कथेसोबतच त्याचं शीर्षकगीतसुद्धा हिट झालं होतं. हे शीर्षकगीत जितकं श्रवणीय तितकेच ते बघावसंही वाटत होतं. या मालिकेने गेल्या महिन्यातच वर्षपूर्तीचं सेलिब्रेशन केले होते.