शिकागोमध्ये हॉलिडे एन्जॉय करते मौनी रॉय,दिसला कुल अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 18:18 IST2017-06-23T12:36:29+5:302017-06-23T18:18:51+5:30
हॉलिडे एन्जॉय करत टीव्ही कलाकार त्यांचे गॉर्जिअस फोटो सोशल मीडियावर अपलोड करत चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. यावेळी त्यांचा लूकही ...
.jpg)
शिकागोमध्ये हॉलिडे एन्जॉय करते मौनी रॉय,दिसला कुल अंदाज
ह लिडे एन्जॉय करत टीव्ही कलाकार त्यांचे गॉर्जिअस फोटो सोशल मीडियावर अपलोड करत चाहत्यांची वाहवा मिळवत असतात. यावेळी त्यांचा लूकही खूप ग्लॅमरस वाटत असल्यामुळे रिलपेक्षा रिअल लाईफ फोटोंना चाहतेही अधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळतेय. आपल्या फेव्हरेट अॅक्ट्रेस व्हॅकेशन फोटो व्हायरल होताच अनेक प्रतिक्रीया कलाकरांच्या पेजवर पाहायला मिळतात.मौनी रॉयही शिकागोमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. एक शांत रिलॅक्स मूडमध्ये तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पाहायला मिळतेय.कसलीच धावपळ नाही फक्त आणि रिलॅक्स असल्याचा आनंद तिच्या चेह-यावर दिसून येतोय.छोट्या पडद्याप्रमाणेच मौनी रॉय आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.मौनी रॉय कोणत्या बॉलिवूड हिरोसह झळकणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. लवकरच नागिन 2 ही मालिका रसिकांचा निरोप घेत असल्यामुळे मौनी आता थेट बॉलिवूडमध्ये अक्षय कुमारची हिरोईन बनत झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.मात्र मिळालेल्या माहितीनुसार मौनी रॉयलाही दबंग भाईजान सलमान खानची साथ मिळाली असल्याचे कळतंय.मौनीला आपल्या होम प्रॉडक्शनअंतर्गत बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचे सलमानने मनावर घेतले आहे. सलमानच्या मते, मौनीचा देसी लूक अतिशय सुंदर आहे. ती साडीसह सगळ्याच पारंपरिक व वेस्टर्न कपड्यांमध्ये सुंदर दिसते. त्याचमुळे मौनीला बॉलिवूडमध्ये आणण्याचे त्याने ठरवले आहे.तसे तुम्हाला ठाऊक असेलच की, सलमान मौनीचा खूप मोठा फॅन आहे. ‘बिग बॉस’मध्ये जेव्हा केव्हा टीआरपीचा विषय निघाला, प्रत्येकवेळी सलमानने ‘नागीन’ मौनी रायची आठवण केली. ‘बिग बॉस’चा टीआरपी वाढावा म्हणून या शोच्या मंचावर मौनी स्पेशल डान्स परफॉर्मन्स करताना दिसली होती. सध्या मौनी रॉयचा भाव चांगलाच वधारल्यामुळे मौनीला कोणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे वेळ आल्यावरच स्पष्ट होईल.