‘मोलकरीण बाई’ मालिकेमध्ये रंगणार गणपती विशेष भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 04:03 PM2019-08-27T16:03:02+5:302019-08-27T16:06:43+5:30

कलाकारांनी शूटिंगच्या वेळा सांभाळत महाएपिसोडसाठी जय्यत तयारी केली. ही सगळी धमाल प्रेक्षकांना गणपती विशेष महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

'Maulkarin Bai' Special Episode of Ganeshotsav 2019 | ‘मोलकरीण बाई’ मालिकेमध्ये रंगणार गणपती विशेष भाग

‘मोलकरीण बाई’ मालिकेमध्ये रंगणार गणपती विशेष भाग

googlenewsNext

गणरायाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमनासाठी सारा आसमंत आतूर आहे. सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठाही खुलल्या आहेत. दहा दिवसांचा हा उत्सव वर्षभराची ऊर्जा देऊन जातो. स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेतल्या शांती नगर वस्तीमध्येही गणरायाचं जल्लोषात स्वागत होणार आहे. साग्रसंगीत पूजा, आरती आणि गोडाधोडाच्या मेजवानीसोबतच जबरदस्त नृत्याची मैफल या सोहळ्यात अनोखे रंग भरणार आहे. एकीकडे अनिता आणि अनिल तर तिकडे गुंजन आणि हृतिकचा डान्स धमाका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

‘मोलकरीण बाई’ मालिकेत गुंजनची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी कासार आणि संपूर्ण टीमने या विशेष भागासाठी खास तयारी केली होती. अश्विनी नृत्य शिकली असली तरी मालिकेत नृत्य करणं हा वेगळा अनुभव असल्याचं तिने सांगितलं. जवळपास पाच दिवस सेटवर आम्ही सगळे सराव करत होतो. शूटिंगच्या वेळा सांभाळत महाएपिसोडसाठी जय्यत तयारी केली. ही सगळी धमाल प्रेक्षकांना गणपती विशेष महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

 

उत्साहाच्या या वातावरणात मात्र शांतीनगर वस्तीवर संघवी बिल्डरच्या रुपात संकट उभं ठाकणार आहे. शांतीनगरची जागा बळकावू पाहणारा संघवी बिल्डर ऐन गणेशोत्सवात शांतीनगर उध्वस्त करायला आलाय. विघ्नहर्ता गणेश शांतीनगरावरचं संकट परतावून लावेल का? संघवी बिल्डरचा मनसुबा उधळला जाईल का? याची उत्कंठावर्धक गोष्ट १ सप्टेंबरच्या गणपती विशेष भागात पाहायला मिळेल.

Web Title: 'Maulkarin Bai' Special Episode of Ganeshotsav 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.