मास्टरशेफचा नवा सिझन लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 15:03 IST2016-05-30T06:44:55+5:302016-09-24T15:03:30+5:30
मास्टरशेफ या कार्यक्रमाचे चारही सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आता या कार्यक्रमाचा पाचवा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या ...

मास्टरशेफचा नवा सिझन लवकरच
म स्टरशेफ या कार्यक्रमाचे चारही सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आता या कार्यक्रमाचा पाचवा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी काहीच दिवसांत मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मुख्य शहरामध्ये ऑडिशन घेतले जाणार आहेत. मास्टरशेफच्या गेल्या पर्वामध्ये संजीव कपूर, विकास खन्ना आणि रणवीर बरार यांनी परीक्षकाची भूमिका साकारली होती. यंदाच्या पर्वात परीक्षकाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरले नसले तरी काहीच दिवसांत हे ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.