यशमुळे निर्माण झाला परीच्या जीवाला धोका; लवकरच तुटणार नेहा-यशची रेशीमगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 01:46 PM2022-03-17T13:46:34+5:302022-03-17T13:50:34+5:30

Mazi tuzi reshimgath: यशची ही एक चूक त्याला चांगलीच महागात पडणार आहे.

marathi tv serial mazi tuzi reshimgath yash and neha war | यशमुळे निर्माण झाला परीच्या जीवाला धोका; लवकरच तुटणार नेहा-यशची रेशीमगाठ?

यशमुळे निर्माण झाला परीच्या जीवाला धोका; लवकरच तुटणार नेहा-यशची रेशीमगाठ?

googlenewsNext

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत सध्या लव्ह ट्रॅक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. नेहा आणि यश यांच्या मैत्रीचं रुपांतर आता प्रेमात झालं आहे. त्यामुळे ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. यामध्येच परीने यशचा वडील म्हणून स्वीकार करावा यासाठी नेहा आणि यश प्रयत्न करत आहे. इतकंच नाही तर यश खास परीच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, हे प्रयत्न करत असतानाच त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे परीच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये यश एक संपूर्ण दिवस परीसोबत घालवतो. मात्र, त्यांच्या नजरचुकीमुळे परीचा लहानसा अपघात होतो. मात्र, या अपघातामुळे परीला चांगलाच मार लागतो. परिणामी, संतापलेल्या नेहाने यशला परी जवळ परवानगीशिवाय न जाण्याचा सल्ला दिला आहे.

परीचा विश्वास संपादन करण्यासाठी यश एक दिवस परीसोबत राहतो. यावेळी तिला शक्य होईल तितकं आनंदी ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. मात्र, खेळाच्या नादात गुंग असलेली परी खेळता खेळता जमिनीवर पडते. परिणामी, तिला चांगलीच दुखापत होते. ही घटना नेहाच्या कानावर पडल्यानंतर ती यशला परीजवळ चुकूनही येऊ नको असं ठणकावून सांगते. त्यामुळे आता यशची ही एक चूक त्याला चांगलीच महागात पडणार असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या प्रकारामुळे नेहा यशपासून दुरावेल का? त्यांच्या नात्यात पुन्हा दुरावा येईल का? की नेहा घडलेल्या प्रकारामागचं खरं कारण समजेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

Web Title: marathi tv serial mazi tuzi reshimgath yash and neha war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.