​मराठी बॉक्स आॅफिस क्रिकेट लीग-२०१६ ची उडणार धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 20:42 IST2016-04-14T03:42:10+5:302016-04-13T20:42:10+5:30

बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतसुद्धा सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे (एम.बी.सी.एल.) दोन पर्व ...

Marathi box office cricket league-2013 will fly away | ​मराठी बॉक्स आॅफिस क्रिकेट लीग-२०१६ ची उडणार धमाल

​मराठी बॉक्स आॅफिस क्रिकेट लीग-२०१६ ची उडणार धमाल

लिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतसुद्धा सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगचे (एम.बी.सी.एल.) दोन पर्व गाजल्यानंतर आता सर्वानाच त्याच्या तिसºया पर्वाचे वेध लागले आहे. यावर्षी २०१६ च्या ह्या तिसऱ्या पर्वाची घोषणा नुकतीच एका शानदार पार्टीत श्रेयस तळपदे व दिप्ती तळपदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कलानिधीचे सरचिटणीस अभिनेते सुशांत शेलार यांनी केली. 


पहिल्या वर्षी लवासा आणि दुसऱ्या वर्षी पंचगणीला ही क्रिकेट लीग संपन्न झाल्यानंतर यंदा एम.बी.सी.एल. चा तिसरा सिझन कोल्हापूरात आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे सामने दहा संघात खेळले जाणार असून ४ ते ६ मे दरम्यान कोल्हापुरातील भव्य असा शाहू मैदानावर प्रथमच प्रेक्षकांच्या उपस्थित रंगणार आहे.

 

डॅशिंग मुंबई, ठाणे शिलेदार, रत्नागिरी टायगर्स, क्लासिक नासिक, फटाका औरंगाबाद, शूर कोल्हापूर, अजिंक्यतारा सातारा, मस्त पूणे, कोहीनूर नागपूर अशा नऊ टीम गेल्या वर्षी मराठी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये होत्या. यंदा दहाव्या टीमचा ह्या लीगमध्ये समावेश झाला आहे. नवी मुंबईचा धडाकेबाज नवी मुंबई हा नवा संघ सहभागी झाला आहे. 



मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग २०१६ च्या शानदार पार्टीत सर्वच कलाकारांनी एकच जल्लोष केला. यावेळी प्रथमच देण्यात येणाऱ्या रोख बक्षीसांची घोषणा करण्यात आली. विजेत्या संघाला अडीच लाखाचे बक्षीस तर उपविजेत्या संघाला सव्वा लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

 

Web Title: Marathi box office cricket league-2013 will fly away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.