अंतराचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन; योगिताचा चव्हाणचा नवा लूक पाहून चाहते सैराट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:52 PM2022-07-19T16:52:06+5:302022-07-19T16:52:40+5:30

Yogita chavhan: अंतराने एक नवं फोटोशूट केलं असून ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

marathi actress yogita chavhan share her letest photo | अंतराचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन; योगिताचा चव्हाणचा नवा लूक पाहून चाहते सैराट

अंतराचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन; योगिताचा चव्हाणचा नवा लूक पाहून चाहते सैराट

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिकांची रेलचेल सुरु आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारही सोशल मीडियावर सातत्याने चर्चिले जात आहेत. यामध्येच सध्या जीव माझा गुंतला (jeeva maza guntala) ही मालिका विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेतील अंतरा आणि मल्हारची जोडी नेटकऱ्यांना विशेष भावली असून हे दोन्ही कलाकार बऱ्याचदा चाहत्यांच्या चर्चेत असतात. यामध्येच आता अंतराने एक नवं फोटोशूट केलं असून ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

'जीव माझा गुंतला' या मालिकेत अंतरा ही भूमिका अभिनेत्री योगिता चव्हाण (yogita chavhan) साकारत आहे.  योगिता सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा ती सेटवरील वा वैयक्तिक जीवनातील काही घडामोडी, अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

योगिताने शेअर केलेल्या फोटोला, "वही शून्य है वही ईकाय जिसके भीतर बसा शिवाय।", असं कॅप्शन दिलं आहे. खऱ्या आयुष्यात योगिता बरीच बोल्ड असून तिने शेअर केलेल्या फोटोवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या फोटोमध्ये योगिताने तिची नजर कॅमेरावर रोखून ठेवली आहे. त्यामुळे तिची ही अदा चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, जीव माझा गुंतला ही योगिताची पहिली मुख्य़ भूमिका असलेली मालिका आहे. यापूर्वी तिने बापमाणूस, जाडूबाई जोरात, नवरी मिळे नवऱ्याला अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.  2018 मध्ये तिने मराठी चित्रपट 'गावठी' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 
 

Web Title: marathi actress yogita chavhan share her letest photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.