Shiv Thakare : “पहिलं आणि शेवटचं....”, शिव ठाकरेबद्दल विचारताच वीणा जगताप भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 03:03 PM2022-10-09T15:03:48+5:302022-10-09T15:04:30+5:30

Shiv Thakare, Veena Jagtap :बिग बॉसच्या घरात शिव व वीणा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अगदी वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही आपल्या हातावर गोंदवला होता. काही दिवस बिग बॉसच्या घराबाहेर देखील ही लव्हस्टोरी चर्चेत होती. पण...

marathi actress veena jagtap angry on talk about shiv thakare break up | Shiv Thakare : “पहिलं आणि शेवटचं....”, शिव ठाकरेबद्दल विचारताच वीणा जगताप भडकली

Shiv Thakare : “पहिलं आणि शेवटचं....”, शिव ठाकरेबद्दल विचारताच वीणा जगताप भडकली

googlenewsNext

बिग बॉस मराठी’चा दुसरा सीझन (Bigg Boss Marathi ) एका लव्हस्टोरीमुळे गाजला होता. होय, ही लव्हस्टोरी होती शिव ठाकरे (Shiv thakare) आणि वीणा जगताप (veena jagtap ) यांची. बिग बॉसच्या घरात शिव व वीणा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अगदी वीणाने शिवच्या नावाचा टॅटूही आपल्या हातावर गोंदवला होता. काही दिवस बिग बॉसच्या घराबाहेर देखील ही लव्हस्टोरी चर्चेत होती. शिव बिग बॉस मराठी 2 चा विजेता ठरल्यानंतर दोघांनी जंगी सेलिब्रेशनही केलं होतं. सोशल मीडियावरही या दोघांच्या प्रेमाला भरतं आलं होतं. पण अचानक दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो डिलीट केले आणि या कपलच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली. पुढे वीणाच्या हातावरचा शिवच्या नावाचा टॅटूही गायब झालेला दिसला. आता काय तर कदाचित शिवचं नावही वीणाला खपत नाही. अलीकडे एका चाहत्याने वीणाला शिवबद्दल छेडलं आणि वीणा जाम भडकली.

वीणानं इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेगमेंट घेतलं होतं. तिथे तिला एका फॅननं ‘शिव दादा आणि तुझ्यात काय सुरू आहे?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नानं वीणा चांगलीच संतापली. युजरच्या या प्रश्नाला तिने तिच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं.

‘पहिलं आणि शेवटचं...मी कोणत्याही व्यक्तीला माझ्या खासगी आयुष्यातील माहिती द्यायला बांधील नाहीये.  थोडी नैतिकता दाखवा आणि इतरांना श्वास घेऊ द्या. मी तुमच्या आयुष्याविषयी कधी विचारते का की काय सुरू आहे आणि काय नाही. मी नेहमी माझ्यापुरती मर्यादित असते..,’असं उत्तर वीणाने दिलं.

 वीणाच्या या उत्तरानं शिव आणि तिच्यात चांगलंच बिनसलं असून दोघांचं ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शिव ठाकरे सध्या ‘बिग बॉस 16’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. तर वीणा मालिकांमध्ये बिझी आहे.

Web Title: marathi actress veena jagtap angry on talk about shiv thakare break up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.