"मराठी इंडस्ट्रीने खूप चांगली अभिनेत्री गमावली...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता गायकवाडची भावुक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:31 IST2025-09-04T13:19:08+5:302025-09-04T13:31:52+5:30
प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता गायकवाडची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली- "खूप अनपेक्षित..."

"मराठी इंडस्ट्रीने खूप चांगली अभिनेत्री गमावली...", प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता गायकवाडची भावुक प्रतिक्रिया
Prajakta Gaikwad Share Memories About Priya Marathe: लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ३१ ऑगस्ट रोजी अभिनेत्रीचं कर्करोगामुळे निधन झालं. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ती कॅन्सरचा सामना करत होती.हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनय कौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठे गेल्या वर्षभरापासून लाइमलाइटपासून दूरच होती. तिच्या निधनाने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.त्यामुळे संपूर्ण कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. प्रिया मराठेच्या अकाली निधनाने सर्वानाच धक्का बसला आहे. अशातच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने प्रिया मराठेच्या निधनानंतर भावुक प्रतिक्रिया दिला आहे.
नुकताच प्राजक्ता गायकवाडने 'स्टार विश्व' सोबत संवाद साधला. त्यादरम्यान, अभिनेत्रीने प्रिया मराठेसोबतच्या आठवणी शेअर केल्या. त्यावेळी प्राजक्ता म्हणाली, "जेव्हा मी बातमी पाहिली तर मला धक्काच बसला. कारण, प्रियाताई माझी आवडती अभिनेत्री होती. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. या मालिकेत तिने गोदावरीची भूमिका साकारली होती. त्यामध्ये आमच्या दोघींचे खूप सीन्स एकत्र व्हायचे. आम्ही कित्येक दिवस एकत्र शूट करत होतो. पण, माझ्यासाठी ही गोष्ट खूप अनपेक्षित होती. ती खूप स्ट्रॉंग होती. आपल्या फिटनेसकडेच तसेच ती तिच्या डाएटकडे तितकंच लक्ष द्यायची.पण, माहित नाही असं कसं घडलं. किंबहुना असं असेल जे लोक आपल्याला आवडतात तेच देवाला आवडतात.पण, अजून आम्हाला ती हवी होती. कारण,खूप मोठी, खूप अनुभवी आणि खूप छान अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीने गमावली आहे, असं मला वाटतं. "
त्यानंतर पुढे प्राजक्ताने म्हटलं," तिचा खूप छान स्वभाव होता. ती खूप शिस्तप्रिय होती. शंतनू दादाबरोबर मी एक पूर्ण मालिका केली आहे. त्यामुळे तो किती चांगला आहे शिवाय तिला प्रत्येक बारीक गोष्टीत पाठिंबा द्यायचा, हे आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. तेव्हा ही बातमी कळल्यानंतर मी दोन मिनिटं स्तब्ध होते, मला धक्का बसला होता. कारण, काहीच कळत नव्हतं की हे असं कसं घडलं." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.