सुरूची आडारकरच्या हॉट अंदाजावर फिदा झालेत तिचे फॅन्स, पाहा हा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:29 PM2021-02-08T17:29:19+5:302021-02-08T17:32:47+5:30

सुरुचीने तिचा एक बोल्ड आणि हॉट अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे.

marathi actress suruchi adarkar galamourous photo post on instagram | सुरूची आडारकरच्या हॉट अंदाजावर फिदा झालेत तिचे फॅन्स, पाहा हा फोटो

सुरूची आडारकरच्या हॉट अंदाजावर फिदा झालेत तिचे फॅन्स, पाहा हा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देसुरुचीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून यामध्ये तिचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ती खूपच सुंदर दिसत असल्याचे तिचे फॅन्स कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुची आडारकर नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सुरुची नेहमीच तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि तिचे फॅन्स तिच्या फोटो आणि व्हिडिओंना भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देतात. सुरुचीच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. ती एक खूप चांगली अभिनेत्री असल्याचे तिने नेहमीच सिद्ध केले आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे सुरुचीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

सुरुची सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सुरुचीने तिचा एक बोल्ड आणि हॉट अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. या फोटोमधील सुरुचीच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सुरुचीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून यामध्ये तिचा नवा अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ती खूपच सुंदर दिसत असल्याचे तिचे फॅन्स कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

२००७ मध्ये सुरुचीने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. ‘का रे दुरावा’, ‘अंजली’ या मालिकेतून सुरुची घराघरात पोहोचली. 'का रे दुरावा'मधील सुयश टिळक आणि सुरुची यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सुरुचीने प्रेक्षकांना विविध भूमिकेतून चांगलीच भुरळ पाडली आहे. सुरुचीने 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत पत्रकाराची भूमिका साकारली होती. आपलं बुआ असं आहे', 'ओळख', 'एक तास भुताचा' आणि 'पहचान' या मालिकांमध्ये सुरूची विविध भूमिकांमध्ये दिसली होती.

Web Title: marathi actress suruchi adarkar galamourous photo post on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.