पन्नाशीच्या उंबरठ्यातही ग्लॅमरस दिसतात सुप्रिया पाठारे, म्हणाल्या, "५०व्या वर्षात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:50 PM2024-04-08T13:50:56+5:302024-04-08T13:52:19+5:30

सुप्रिया यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून छाप पाडली. विविधांगी भूमिका साकारत त्या गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. सुप्रिया यांचा आज वाढदिवस आहे. 

marathi actress supriya pathare shared special post on on her 50th birthday | पन्नाशीच्या उंबरठ्यातही ग्लॅमरस दिसतात सुप्रिया पाठारे, म्हणाल्या, "५०व्या वर्षात..."

पन्नाशीच्या उंबरठ्यातही ग्लॅमरस दिसतात सुप्रिया पाठारे, म्हणाल्या, "५०व्या वर्षात..."

उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलेल्या सुप्रिया यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील इंदू आई असो किंवा 'ठिपक्यांची रांगोळी'मधील माई...सुप्रिया यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून छाप पाडली. विविधांगी भूमिका साकारत त्या गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. सुप्रिया यांचा आज वाढदिवस आहे. 

अभिनयाच्या जोरावर मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सुप्रिया या टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही त्या पोस्टद्वारे चाहत्यांना देत असतात. सुप्रिया आता ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांनी वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवरुन त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी गुलाबी रंगाची डिझायनर साडी नेसल्याचं दिसत आहे. केस मोकळे सोडत एकमद लाइट मेकअप केल्याचं दिसत आहे. गळ्यात खड्यांचे दागिने घालत त्यांनी खास लूक केला आहे. पन्नाशीच्या उंबरठ्यावरही सुप्रिया अगदी ग्लॅमरस दिसत आहेत.

सुप्रिया यांनी या फोटोत खास पोझही दिल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्या म्हणतात, "५०व्या वर्षात पदार्पण". सुप्रिया पाठारे यांच्या या फोटोवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.  दरम्यान, सुप्रिया यांनी 'कुलवधू', 'पुढचं पाऊल', 'जागो मोहन प्यारे', 'मोलकरीण बाई' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या 'साधी माणसं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

Web Title: marathi actress supriya pathare shared special post on on her 50th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.