मराठी अभिनेत्रीच्या एक्स पतीला होतं दारुचं व्यसन, रडत म्हणाली - "१७ वर्षे मी लग्न टिकवण्याचा प्रयत्न केलेला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 09:34 IST2025-07-10T09:33:30+5:302025-07-10T09:34:03+5:30

एप्रिलमध्ये अभिनेत्रीच्या एक्स पतीचं निधन झालं. त्यानंतर आता एका मुलाखतीत त्याच्याबद्दल सांगितले.

Marathi actress Shubhangi Atre's ex-husband was addicted to alcohol, she said in tears - ''I tried to save the marriage for 17 years...'' | मराठी अभिनेत्रीच्या एक्स पतीला होतं दारुचं व्यसन, रडत म्हणाली - "१७ वर्षे मी लग्न टिकवण्याचा प्रयत्न केलेला..."

मराठी अभिनेत्रीच्या एक्स पतीला होतं दारुचं व्यसन, रडत म्हणाली - "१७ वर्षे मी लग्न टिकवण्याचा प्रयत्न केलेला..."

अभिनेत्री शुभांगी अत्रे(Shubhangi Atre)ला 'भाभीजी घर पर है'(Bhabhiji Ghar Par Hai)मधून नाव आणि प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने अभिनेत्री शिल्पा शिंदेची जागा घेतली होती. या शोमध्ये ती अंगूरी भाभीच्या भूमिकेत आहे. शुभांगी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने तिचा एक्स पती पियुष पुरेबद्दल सांगितले. एप्रिलमध्ये पियुषचे निधन झाले आणि त्याच्या काही काळापूर्वीच शुभांगीने पियुषला घटस्फोट दिला होता.

आता सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शुभांगी अत्रे म्हणाली, ''लग्नानंतर मला पियुषच्या दारू पिण्याच्या सवयीबद्दल कळले. मी लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही १७ वर्षे एकत्र राहिलो. मी काम करत असल्याने परिस्थिती कधी बिघडली हे मला कळलेच नाही. माझी मुलगी आशी मला त्याच्या दारू पिण्याबद्दल सांगायची. दारू पिल्यानंतर तो चिडचिड करायचा. जेव्हा मी घरी राहिले आणि स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिले तेव्हा कोविड हा काळ डोळे उघडणारा होता.''

''घटस्फोटानंतरही मी त्याला आर्थिक मदत करत होते पण...''

शुभांगी पुढे म्हणाली, ''२०१८ मध्ये तो ट्रान्सप्लांट उपचारासाठी स्टिरॉइड्स घेत होता आणि त्यासोबतच त्याने दारू पिण्यासही सुरुवात केली. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला त्याची जीवनशैली बदलण्यास सांगितले होते. त्यावेळीही शुभांगीने लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मी पीयूषला दोन वर्षे पुनर्वसन केंद्रात जाण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर २०२० मध्ये आम्ही वेगळे झालो. त्याचा माझ्यावर मानसिक परिणाम होत होता. घटस्फोटानंतरही मी त्याला आर्थिक मदत करत होते पण तरीदेखील त्याने दारू पिणे थांबवले नव्हते.'' जेव्हा शुभांगीला विचारण्यात आले की तिला तिच्या एक्स पतीची आठवण येते का, तेव्हा ती भावनिक झाली आणि म्हणाली, 'कधीकधी.'

Web Title: Marathi actress Shubhangi Atre's ex-husband was addicted to alcohol, she said in tears - ''I tried to save the marriage for 17 years...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.