नजाकत! धनश्रीवर चढला 'केसरिया' रंग; शेअर केला मनमोहक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:47 PM2022-08-03T17:47:36+5:302022-08-03T17:48:23+5:30

Dhanashri Kadgaonkar: धनश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

marathi actress Dhanashri Kadgaonkar share video on Brahmastra movie song Kesariya | नजाकत! धनश्रीवर चढला 'केसरिया' रंग; शेअर केला मनमोहक व्हिडीओ

नजाकत! धनश्रीवर चढला 'केसरिया' रंग; शेअर केला मनमोहक व्हिडीओ

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर धनश्रीने छोट्या पडद्यावर तिचा दबदबा निर्माण केला आहे. छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब या नावाने ओळखली जाणारी धनश्री लवकर 'तू चाल पुढं' या नव्या मालिकेत झळकणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे. यामध्येच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

धनश्री सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम तिचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीदेखील असाच लक्ष वेधून घेणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या लूकमधील साधेपणा जास्त मोहक वाटत आहे. 

धनश्रीने मेहंदी रंगाची साडी नेसली असून त्यावर हलकासा मेकअप केला आहे. तसंच  'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातील 'केसरीया तेरा इश्क हे पिया....' हे गाणं बॅकग्राऊंडला सुरु असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तिने दिलेले एक्स्प्रेशन्स, आणि लूकमधील साधेपणा चाहत्यांना विशेष भावत आहे.
 

Web Title: marathi actress Dhanashri Kadgaonkar share video on Brahmastra movie song Kesariya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.