"या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 01:10 PM2023-09-22T13:10:46+5:302023-09-22T13:12:34+5:30

राजपेक्षा दोघी अभिनेत्रीच मोठ्या दिसत आहेत असं म्हणत सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

marathi actress Apurva Memlekar gives reply to trollers who says raj is looking younger than tejashree and her in premachi goshta serial | "या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...'

"या दोघींपेक्षा हिरोच लहान दिसतो" ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकर म्हणाली, 'आमचं वय...'

googlenewsNext

सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानची (Tejashree Pradhan) नवी मालिका  'प्रेमाची गोष्ट' सुरु झाली आहे. यामध्ये राज हंचनाळेसोबत (Raj Hanchnale) तिची जोडी जमली आहे. तर अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) खलनायिका आहे. हे तिघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत आहेत. शुभांगी गोखलेही मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचा प्रोमो आला तेव्हाच ही हिंदी मालिकेची कॉपी असल्याची टीका झाली. तर आता अभिनेता राजपेक्षा दोघी अभिनेत्रीच मोठ्या दिसत आहेत असं म्हणत सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत तेजश्री मुक्ता ही भूमिका साकारत आहे. तर राज हंचनाळे सागरच्या भूमिकेत आहे. अपूर्वा सावनी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सावनी आणि सागर यांना एक मुलगी असून दोघांचा घटस्फोट झाला आहे. तर त्यांच्या मुलीची मुक्तासोबत चांगली गट्टी जमलेली असते. मालिकेत दाखवलेली सागर आणि सावनीची जोडी असो किंवा नंतर जमणारी सागर आणि मुक्ताची जोडी असो प्रेक्षकांना काही या जोड्या फारशा पसंतीस पडलेल्या दिसत नाही. कारण दोघी अभिनेत्रींहून अभिनेता राज लहान दिसतोय अशी टीका प्रेक्षक करत आहेत. 

या ट्रोलिंगला थेट उत्तर देत अपूर्वा नेमळेकर म्हणाली,'हो मी याबद्दल ऐकलं, कमेंटही वाचल्या. काही लोकांना आमची जोडी आवडली तर काहींना नाही. आम्ही दोघी राजपेक्षा वयाने मोठ्या दिसतो असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहित नाही की आमचं तिघांचं वय हे सारखंच आहे. आम्ही तिघेही एकाच वयाचे असून जोशाने काम करतो. भविष्यात या लोकांची मतं नक्की बदलतील असा मला विश्वास आहे.'

'प्रेमाची गोष्ट' मालिकेने प्रसारणानंतर पहिल्याच आठवड्यात टीआरपीमध्ये बाजी मारली. सर्वोच्च स्थानी असलेल्या 'ठरलं तर मग' मालिकेला मागे टाकत प्रेमाची गोष्टने नंबर १ वर आली. कित्येक महिने लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' मालिकेलाही तेजश्रीने मागे टाकलं.

Web Title: marathi actress Apurva Memlekar gives reply to trollers who says raj is looking younger than tejashree and her in premachi goshta serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.