'हसताय ना? हसायलाच पाहिजे' बहुचर्चित कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात, अलका कुबल यांनी शेअर केला सेटवरील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:19 PM2024-04-11T12:19:42+5:302024-04-11T12:21:12+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी सोशल मीडियावर सेटवरील फोटो शेअर केले आहेत.

Marathi Actress Alka Kubal Athalye Shared Photos Of Hastay Na Hasaylach Pahije Set | 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' बहुचर्चित कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात, अलका कुबल यांनी शेअर केला सेटवरील फोटो

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' बहुचर्चित कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात, अलका कुबल यांनी शेअर केला सेटवरील फोटो

'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर आता निलेश साबळे आणि भाऊ कदम हे कलर्स मराठीच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धी मिळवलेला ओंकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील या नव्या कोऱ्या कॉमेडी शोच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी सोशल मीडियावर सेटवरील फोटो शेअर केले आहेत.

अलका कुबल यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये भरत जाधव व निलेश साबळे पाहायला मिळत आहेत. तर एका फोटोत अलका या एका खुर्चीत बसलेल्या पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत अलका यांनी लिहिलं, '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' लवकरच फक्त 'कलर्स मराठी'वर'. तर या कार्यक्रमात अभिनेता भरत जाधव आणि अलका कुबल दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ''हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार - रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.  डॉ. निलेश साबळेबरोबरच भाऊ कदम आणि ओंकार भोजने सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची  लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत. 

Web Title: Marathi Actress Alka Kubal Athalye Shared Photos Of Hastay Na Hasaylach Pahije Set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.