मराठमोळा हा अभिनेता गरजवंतासाठी बनला देवदूत, अशी करतोय मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 06:18 PM2020-05-06T18:18:10+5:302020-05-06T18:18:48+5:30

सध्याच्या कठीण काळात हा अभिनेता सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे.  

Marathi Actor Aashutosh Gokhale helped to needy people in Corona TJL | मराठमोळा हा अभिनेता गरजवंतासाठी बनला देवदूत, अशी करतोय मदत

मराठमोळा हा अभिनेता गरजवंतासाठी बनला देवदूत, अशी करतोय मदत

googlenewsNext

जगात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. त्यात भारतातही कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागला. या आजाराची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. आजूबाजूचं वातावरण जरी नकारात्मक असलं तरी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना आयुष्याला नवी उभारी देतात. अभिनेता आशुतोष गोखले सध्याच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे.


स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकच्या रुपात तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोरोनाच्या संकटामुळे शूटिंग थांबलं असलं तरी आशुतोषने हाती घेतलंल काम अविरत सुरु आहे.

खान चाहिए डॉट कॉम या संस्थेसोबत तो जोडला गेलाय. ही संस्था मुंबईतील बेघर आणि या कठीण काळात उपासमार होत असलेल्या गरजूंना जेवण पोहोचवण्याचे काम करते. गेल्या काही दिवसांपासून आशुतोष या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतोय. ही संस्था दररोज ७५ हजारांहून अधिक फूड पॅकेट्सचे वाटप करते.

आशुषोत दररोज वांद्रे ते दहिसर लिंक रोड, ओशिवरा, जुहू, गोरेगाव अश्या भागातील गरजूंना अन्न पोहोचवतो. अर्थात सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करत आणि आवश्यक ती काळजी घेत आशुतोष हे काम नित्यनेमाने करतो.


या उपक्रमाविषयी सांगताना आशुतोष म्हणाला, आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचं देणं लागतो. याच जाणीवेतून हा उपक्रम हाती घेतला. समाजभान जपण्याची ही एक चांगली संधी आहे. माझ्या कुटुंबियांचा देखिल मला पाठिंबा आहे. कोरोनाचा संकट लवकरच सरेल आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात होईलच. पण सध्या वेळ सत्कार्णी लागत असल्याचा आनंद आहे.

Web Title: Marathi Actor Aashutosh Gokhale helped to needy people in Corona TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.