​एक श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेच्या सेटवर झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 16:22 IST2017-03-27T10:52:52+5:302017-03-27T16:22:52+5:30

एक श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेला पहिल्याच दिवसांपासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या मुलींच्या स्वाभिमानासाठी लढणारी आई प्रेक्षकांना ...

A makeup ... Swabhiman happened on the sets of the accident | ​एक श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेच्या सेटवर झाला अपघात

​एक श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेच्या सेटवर झाला अपघात

श्रृंगार... स्वाभिमान या मालिकेला पहिल्याच दिवसांपासून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या मुलींच्या स्वाभिमानासाठी लढणारी आई प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेचे कथानक हे इतर मालिकांपेक्षा वेगळे असल्याने प्रेक्षकांना ते खूप आवडत आहे. या मालिकेत साहिल उप्पल कुणाल तर समरिध बावा करण ही भूमिका साकारत आहे. या दोघांच्याही भूमिकेचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे. या मालिकेच्या सेटवर नुकताच एक अपघात झाला आणि त्यात साहिल आणि समरिध यांना दुखापत झाली. 
या मालिकेसाठी नुकतेच एक हाणीमारीचे दृश्य समरिध आणि साहिल यांच्यावर चित्रीत करायचे होते. पण या दृश्याच्यावेळी या दोघांनाही चांगलीच दुखापत झाली. दृश्याच्या मागणीनुसार समरिधने टेबलवर पडणे गरजेचे होते. पण चित्रीकरण करत असताना समरिध अभिनय करण्यात पूर्णपणे तल्लीन झाला असल्याने तो टेबलवर आपटण्याऐवजी जमिनीवर आदळला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच एका दृश्यात साहिलला ढकलले जाणार होते. पण चित्रीकरण्याच्यावेळी त्याला खूपच जोरात ढकलले गेले. त्यामुळे त्याचे डोके कॅमेऱ्यावर आदळले. साहिल आणि समरिध या दोघांच्याही डोक्याला चांगलेच लागले होते. त्यामुळे त्या दोघांनी त्यावर उपचार घ्यावा आणि आराम करावा असे टीममधील सगळ्यांचे म्हणणे होते. पण या दोघांनीही त्या गोष्टीसाठी नकार दिला आणि त्याही अवस्थेत चित्रीकरण पूर्ण केले. 
समरिध आणि साहिलचे यासाठी संपूर्ण टीमने चांगलेच कौतुक केले. दुखापत झाली म्हणून समरिध आणि साहिल रडत बसले नाही तर चित्रीकरण करत असताना आम्हाला पाहा किती छान बक्षीस मिळाले असे म्हणत ते स्वतःचीच टर उडवत होते. 

sahil uppal

Web Title: A makeup ... Swabhiman happened on the sets of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.