'सावत्या लेका वहिनी मारतील ...', शिवाली परब आणि रोहित मानेचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 05:48 PM2024-03-12T17:48:54+5:302024-03-12T17:52:20+5:30

अभिनेत्री शिवाली परबने तिचा आणि रोहित मानेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

maharashtrachi hasyajatra fame actress Shivali Parab and Rohit Mane's romantic video Trending On Social Media | 'सावत्या लेका वहिनी मारतील ...', शिवाली परब आणि रोहित मानेचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत

'सावत्या लेका वहिनी मारतील ...', शिवाली परब आणि रोहित मानेचा रोमँटिक व्हिडीओ चर्चेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. कलाकारांना या कार्यक्रमाने नवी ओळख मिळाली. प्रेक्षक या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांवर भरभरून प्रेम करत असतात. यापैकीच कल्याणची चुलबुली शिवाली परब (Shivali Parab) आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने (Rohit Mane) यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या रोमँटिक व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 

शिवालीने 'माहिया' असं कॅप्शन देत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओमध्ये  शिवाली आणि रोहित हे व्हाईट ड्रेसमध्ये दिसून येत आहेत. शिवालीने हलका मेकअप आणि केसात गजरा माळून आपला लूक पुर्ण केला. व्हिडीओमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज  पाहायला मिळतोय.  दोघांनी अभिनेता हृतिक रोशनच्या 'फिझा' चित्रपटातील 'आजा माहिया' या गाण्यावर डान्स केला आहे. चित्रपटातील गाण्याप्रमाणे रोहित आणि शिवालीनेही अगदी हुक स्टेप्स केल्याचं पाहायला मिळतंय. 

शिवाली आणि रोहितच्या या रोमँटिक व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने 'शिवाली हे खरंय का ?' असा सवाल केला. तर आमखी एकाने 'सावत्या लेका', 'सवत्या वहिनी मारतील', 'आरं हे कधी झालं सवत्या....', 'आज जेवण बाहेरच कर मित्रा...', अशा भन्नाट कमेंट केल्या आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर शिवालीने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील चाहते आहेत. तर सावत्या या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे रोहित माने. रोहित माने त्याच्या सहज आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे अल्पावधीतच महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये लोकप्रिय झाला. शिवाली आणि सावत्या हे लोकप्रिय कलाकार आहेत. 


 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame actress Shivali Parab and Rohit Mane's romantic video Trending On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.