'या' स्पर्धकाला पाहून माधुरी दीक्षित झाली आर्श्चचकित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 15:15 IST2018-06-06T09:45:07+5:302018-06-06T15:15:07+5:30

कलर्सच्या डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने ने वयाला बंधन नसते आणि एखाद्याच्या आवडीला कोणताही अडथळा रोखू शकत नाही हे ...

Madhuri Dikshit, seeing this 'Contestant' arbitrarily! | 'या' स्पर्धकाला पाहून माधुरी दीक्षित झाली आर्श्चचकित!

'या' स्पर्धकाला पाहून माधुरी दीक्षित झाली आर्श्चचकित!

र्सच्या डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने ने वयाला बंधन नसते आणि एखाद्याच्या आवडीला कोणताही अडथळा रोखू शकत नाही हे सिध्द केले आहे. आगामी एपिसोड मध्ये बॉलिवूडची डान्सिंग क्विन आणि परीक्षक माधुरी दिक्षीतला फिरोज खान हा आशावादी स्पर्धक सुखद आश्चर्याचा धक्का देणार आहे. माधुरीच्या सिनेमांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करणाऱ्या फिरोझ खान या 52 वर्षांच्या डान्सरने मंचावर स्पर्धक म्हणून येऊन आणि मनसोक्त नाचून तिला आश्चर्यचकित केले. खूप वर्षांनंतर माधुरीच्या समोर नाचताना फिरोझ भारावून गेला होता. मुलांची काळजी घेण्यासाठी त्याने डान्स करणे बंद केले होते ते आता 14 वर्षांनंतर सुरू केले आहे.

स्वतःची उत्सुकता सांगताना, फिरोझ खानने सांगितले, माधुरी माझ्या नेहमीच अतिशय आवडत्या अभिनेत्री आहे आणि त्याच्यामुळे मला डान्सिंग मध्ये करियर करण्याची प्रेरणा मिळाली आहे. मी अनेक वर्षांपासून बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत आहे आणि डान्स दिवाने सारखा मंच या वयातही मला मनमोकळेपणाने नाचता येण्यासाठी मिळाला याचा मला आनंद आहे. आधीच्या डान्स शो मधील फाफटपसारा दूर ठेवत. या वैशिष्ट्यपूर्ण स्वरुपाच्या शो मधून डान्सची अतिशय आवड असणाऱ्यांना डान्सचे कौशल्य दाखविण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे. मुले, तरुण आणि प्रौढ अशा 3 वयोगटातील सर्व स्पर्धकांना त्यांच्या स्वतःच्या श्रेणीत त्यांचे कौशल्य दाखविता येणार आहे. प्रत्येक श्रेणीतील एक स्पर्धक भारताच्या एकमेव डान्स दिवाने साठी लढत देतील.

उत्कृष्ट डान्सर त्यांच्या कौशल्याने उत्कृष्ट बनत नाहीत तर ते त्यांच्या पॅशनमुळे प्रसिद्ध होतात. संपूर्ण देशात एकमेव डान्स दिवानेच्या शोधासाठी कलर्स भारतातील तीन पिढ्यांना मोठ्या मंचावर त्यांची कला सादर करण्याची संधी देत आहे आणि याचे परीक्षक माधुरी दीक्षित, शशांक खेतान आणि तुषार कालिया आहेत. 

Web Title: Madhuri Dikshit, seeing this 'Contestant' arbitrarily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.