​माधुरी देसाईने अभिनयाला केला हाय आणि फार्मसीला केला गुडबाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 14:55 IST2017-05-17T09:25:56+5:302017-05-17T14:55:56+5:30

माधुरी देसाई पुढचं पाऊल या मालिकेत सध्या कल्याणी ही भूमिका साकारत आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर ...

Madhuri Desai did the acting and made the pharmacy a goodbye! | ​माधुरी देसाईने अभिनयाला केला हाय आणि फार्मसीला केला गुडबाय!

​माधुरी देसाईने अभिनयाला केला हाय आणि फार्मसीला केला गुडबाय!

धुरी देसाई पुढचं पाऊल या मालिकेत सध्या कल्याणी ही भूमिका साकारत आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना अभिनेत्री माधुरी देसाईने अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. फार्मसीचं शिक्षण सोडून अभिनय क्षेत्रात आलेल्या माधुरीने पुढचं पाऊल या मालिकेत नवी कल्याणी म्हणून एंट्री केली आहे. 
माधुरीने बायोटेक्नॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. ती फार्मसीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती. मात्र तिला अभिनय, नाटक याची प्रचंड आवड होती. या आवडीतूनच तिने प्रा. वामन केंद्रे यांच्या नाट्य कार्यशाळेला हजेरी लावली. पण त्यांच्या नाटकात छोटी भूमिका करण्याची संधी मिळाल्यावर तिचे आयुष्य बदलून गेले. अभिनयातच करिअर करायचे असे ठरवून तिने फार्मसीला गुडबाय केला. 'येक नंबर' या मालिकेद्वारे तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अल्पावधीतच आपल्या अभिनयाने तिने इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेतले. आता ती नवीन कल्याणी म्हणून पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेत दाखल झाली आहे. बार डान्सर असलेली कल्याणी ही व्यक्तिरेखा मालिकेला नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. आपल्या भूमिकेविषयी माधुरी सांगते, मला नेहमी प्रयोग करायला आवडतात. कल्याणी ही व्यक्तिरेखा म्हणजे माझ्यासाठी प्रयोग आहे. मला वेगळे काहीतरी करून पहायची संधी या मालिकेने दिली. पुढचं पाऊल सारख्या मोठ्या मालिकेत अशी महत्त्वाची भूमिका साकारायला मिळणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. बार डान्सर ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक आहे. आपल्या कामाशी प्रामाणिक असलेली आणि कष्टाळू असलेली ही कल्याणीची ही भूमिका करायला मला सध्या मजा येत आहे.

Web Title: Madhuri Desai did the acting and made the pharmacy a goodbye!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.