n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">इश्कबाज या मालिकेत काम करणारी सुभा रजपूत सध्या मालिकेच्या सेटवर स्कूटीवरून येत आहे. मुंबईच्या प्रचंड ट्रफिकमुळे जवळच्या ठिकाणी जायलादेखील कित्येक तास लागतात. त्यामुळे गाडीपेक्षा टू व्हिलरच चांगली असे सुभाचे म्हणणे आहे. मालिकेच्या सेटवर पोहोचायला तिला कित्येक तास लागत असत. त्यामुळे तिने गाडीने येणे बंद केले आणि आता ती सेटवर स्कूटीने यायला सुरुवात केली. सुभाला कधीही सेटवर वेळेवर पोहोचायला आवडते. आपल्यासाठी कोणी वाट पाहाणे ही गोष्टच तिला आवडत नाही. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला. सुभाला नेहमीच गाडीपेक्षा स्कूटी आवडते. मी गेल्या 10 वर्षांपासून स्कूटी चालवत असून कुठेही जायचे असल्यास मी नेहमीच पहिली पसंती स्कूटीलाच देते असे सुभा सांगते.
Web Title: In love with well-loved skutty
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.