ये प्यार नही तो क्या हैच्या सेटवर नमित खन्नाने अशी उडवली पलक जैनची टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 11:44 IST2018-04-18T06:14:24+5:302018-04-18T11:44:24+5:30

सोनी एंन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या ये प्यार नही तो क्या है मधील मॉडेलपासून अभिनेता बनलेल्या नमित खन्नाच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पडद्यावर दिसत ...

This love does not exist on the set of what is blamed on the blink of a blinking Jain chant | ये प्यार नही तो क्या हैच्या सेटवर नमित खन्नाने अशी उडवली पलक जैनची टर

ये प्यार नही तो क्या हैच्या सेटवर नमित खन्नाने अशी उडवली पलक जैनची टर

नी एंन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या ये प्यार नही तो क्या है मधील मॉडेलपासून अभिनेता बनलेल्या नमित खन्नाच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पडद्यावर दिसत असण्यापेक्षाही बरेच काही जाणून घेण्यासारखे आहे. त्याची पडद्यावरील भूमिका सिद्धांत सिन्हा ही महत्वाकांक्षी आणि निर्भिड आहे. त्याच्या स्टबल लुकमुळे त्याच्या पडद्यावरील भूमिकेत सौम्यता आणि दणकटपणाची भर पडते.
मात्र त्याउलट, प्रत्यक्ष जीवनात नमित काहीसा विनोदी आणि चैतन्यशील आहे, खळाळून हसणारा आणि गंमतीजमती करणारा तो व्यक्ती आहे. विनोदाच्या आपल्या उत्साही शैलीकरिता प्रसिद्ध असलेला आणि महिलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याच्या गंमतींना सेटवरील प्रत्येकजण केव्हा ना केव्हा तरी बळी पडलेला आहे. अलीकडील बळी म्हणजे पलक जैन म्हणजेच या मालिकेतील अनुष्का रेड्डी. त्याने ती शुटिंग करत असलेल्या वाड्यामध्ये भुताटकी असल्याचे तिला सांगितले. पलकने इतक्या सहजपणे त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवला की तिची त्या परिसरात एकटी फिरण्याची हिंमतच होत नव्हती. मात्र नंतर तिला कळले की, हा सर्व बनाव तिच्या खोडकर सहअभिनेता नमितच्या डोक्यामध्ये शिजलेला होता. काही दिवस पलकला जे सर्व काही घडत होते ते सर्व खरेच वाटायचे आणि इतर सर्वांना तिची गंमत वाटायची. याविषयी नमित सांगतो, “लहाणपनापासूनच मी एक खोडकर मुलगा होतो. मात्र लोकांना त्यावर विश्वास बसणे कठीण व्हायचे. कारण की मी खूप समजूतदार असण्याचेच सगळ्यांना दाखवायचो. मला नेहमीच निरूपद्रवी गंमती करायला आवडायच्या मग ती शाळा असो, कॉलेज किंवा शूट असो. मला गोष्टींच्या विनोदी बाजू नेहमीच दिसतात आणि निरूपद्रवी गंमती केल्याने वातावरण निवळते आणि सहकाऱ्यांसोबत आपले धागे आणखी दृढ होतात. असे असले तरी सुद्धा मला सिद्धांत सिन्हाची भूमिका आवडते, जरी आमच्यामध्ये काही समानता असली तरी बरीच विविधता सुद्धा आहे. सिद्धांत खूप गंभीर, रागीट, गर्विष्ठ आणि महत्वाकांक्षी असल्याने माझ्यापेक्षा वेगळी भूमिका मला साकारायला मिळतेय याचा मला आनंद होत आहे. मला बऱ्याच पातळीवर एक अभिनेता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून विकसित होण्याची संधीही मिळते. मात्र पडद्यावरही खोडकर दृश्यांच्या गंमतीजमती करणे मला नक्कीच आवडेल!”

Also Read : ‘इंडस्ट्रीत नाव कमवायचे असेल तर स्वत:वर विश्वास ठेवा’ - पलक जैन

 

Web Title: This love does not exist on the set of what is blamed on the blink of a blinking Jain chant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.