​लव्ह लग्न लोचामधील हा अभिनेता पडला प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 10:25 IST2016-11-08T10:25:59+5:302016-11-08T10:25:59+5:30

लव्ह, लग्न, लोचा या मालिकेचा विषय हा तरुणांच्या भावविश्वावर आधारित असल्याने ही मालिका तरुणपिढीला खूप आवडते. आता या मालिकेत ...

In love, this actor falls in love loop | ​लव्ह लग्न लोचामधील हा अभिनेता पडला प्रेमात

​लव्ह लग्न लोचामधील हा अभिनेता पडला प्रेमात

्ह, लग्न, लोचा या मालिकेचा विषय हा तरुणांच्या भावविश्वावर आधारित असल्याने ही मालिका तरुणपिढीला खूप आवडते. आता या मालिकेत प्रेक्षकांना आणखी एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. 
या मालिकेतील सुमीत म्हणजेच ओंकार गोवर्धन आता प्रेमात पडणार असून यामुळे मालिकेच्या कथानकाला एक कलाटणी मिळणार आहे. त्याच्या आयुष्यात आता एक मुलगी येणार असून यामुळे त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलणार आहे. त्याच्या आयुष्यात सौम्या येणार असून ही त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या मालिकेत सौम्याची भूमिका अक्षया गुरव साकारत आहे. सौम्या ही दिसायला अतिशय सुंदर, डॅशिंग अशी आहे. तिला तिच्यावर लादलेली बंधने कधीच आवडत नाहीत. तिला हवे तसे ती आयुष्य जगते. आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगला पाहिजे असे मानणारी ती आहे. त्यामुळे आता यांची प्रेमकथा कशी फुलतेय हे पाहाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 
लव्ह लग्न लोचा या कार्यक्रमाच्या सेटवर तर सध्या चांगलीच धमाल मस्ती सुरू आहे. कारण या मालिकेत सक्षम कुलकर्णी, विवेक सांगळे, सिद्धी कारखानीस, ओंकार गोवर्धन, अक्षया गुरव, रुचिता जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे सगळेच एकाच वयोगटातील असल्याने त्यांचे खूप चांगले ट्युनिंग जमले आहे. सगळेच कलाकार अतिशय तरुण असल्याने सेटवर एक वेगळीच एनर्जी सगळ्यांना पाहायला मिळत आहे आणि त्यात आता मालिकेत सुमीतच्या प्रेमकथेचा ट्रक सुरू झाल्यापासून तर एक वेगळाच उत्साह मालिकेच्या सेटवर पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना हा आगामी ट्रक आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: In love, this actor falls in love loop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.