'एक अलबेला'नं उभारली प्रमोशनची गुढी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 10:41 IST2016-04-07T17:41:06+5:302016-04-07T10:41:51+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची खास ओळख निर्माण केलेले दिवंगत अभिनेता भगवानदादा यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित 'एक अलबेला' हा चित्रपट लवकरच ...

A lot of promotion made by 'A Albella' | 'एक अलबेला'नं उभारली प्रमोशनची गुढी

'एक अलबेला'नं उभारली प्रमोशनची गुढी

ंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची खास ओळख निर्माण केलेले दिवंगत अभिनेता भगवानदादा यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित 'एक अलबेला' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवुडची तगडी कलाकार विदया बालन या चित्रपटातून गीता बाली यांच्या भूमिकेद्वारे मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे त्यामुळे चित्रपटाची चर्चा व उत्सुकता देखील प्रेक्षकामध्ये पाहायला मिळत आहे. नुकतेच गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर या चित्रपटाच्या प्रमोशनची गुढी उभारण्यात आली. या चित्रपटात भगवानदादांची भूमिका साकारणारा अष्टपैलू अभिनेता मंगेश देसाई, भगवानदादांच्या पत्नीची भूमिका केलेली अभिनेत्री तेजस्वी पाटील, दिग्दर्शक शेखर सरतांडेल, कार्यकारी निमार्ता कुणाल शेट्ये आदी कलाकार या वेळी उपस्थित होते.आनंदाची गुढी उभारल्यानंतर मंगेश आणि चित्रपटाच्या टीमनं 'भगवानदादा स्टाईल'नं डान्स करून अनोख्या पद्धतीनं भगवानदादांना अभिवादन केलं.'भगवानदादा यांच्यावर आधारित चित्रपट करायला मिळणं ही मोठी संधी आहे. त्याशिवाय हिंदी चित्रपटात यशाच्या शिखरावर असताना विद्या बालन मराठी चित्रपट करतात ही वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. मंगेश देसाईनं उत्तम पद्धतीनं भगवानदादा साकारले आहेत. चित्रपटही उत्तम तयार झाला आहे. आता तो रसिकांपर्यंत आणि भगवानदादांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी सांगितले.

Web Title: A lot of promotion made by 'A Albella'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.