'लागिरं झालं जी'ची 'शीतल' इंस्टाग्रामवर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 12:54 IST2017-05-11T07:22:23+5:302017-05-11T12:54:55+5:30
छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतायत. विविध मालिकांमधील नायक-नायिकांच्या जोड्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. मग ती राणा- ...

'लागिरं झालं जी'ची 'शीतल' इंस्टाग्रामवर दाखल
छ ट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतायत. विविध मालिकांमधील नायक-नायिकांच्या जोड्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. मग ती राणा- अंजली असो किंवा गुरुनाथ-राधिका किंवा मग शिव-गौरी असो. प्रत्येक जोडी घराघरात पोहचली. या प्रत्येक जोडीला रसिकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं. आता छोट्या पडद्यावर नव्यानं दाखल झालेली मालिका 'लागिर झालं जी'ही रसिकांमध्ये सुपरहिट ठरत आहे. ही मालिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली आहे. टीव्ही मालिकांमधील इतर जोड्यांप्रमाणेच या मालिकेतील शीतल आणि अजिंक्यची जोडीसुद्धा रसिकांच्या मनात स्थान मिळवू लागली आहे. या मालिकेत शीतलची भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर ही साकारते आहे. शीतलचा अंदाज रसिकांना चांगलाच पसंत पडतो आहे. त्यामुळेच टीव्हीमधली शीतल म्हणजेच शिवानी काय करते,तिच्याविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे.रसिकांप्रमाणेच शीतल हिलाही रसिकांशी कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळेच की काय शिवानी बावकर सोशल झाली आहे. शिवानीने नुकतीच इंस्टाग्रामवर एंट्री केली आहे. आपल्या या नव्या अकाऊंटवर शीतलने आपले फोटोसुद्धा शेअर केले आहेत. शीतल आणि अजिंक्यच्या जोडीवर आधारित लागिर झालं जी ही मालिका आहे. मालिकेतील अजिंक्यला सैन्यात भरती व्हायचे आहे. ते त्याचे पहिले प्रेम आहे. याच फौजीच्या प्रेमात शीतल कशी पडते हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळणार आहे.
![]()
![]()
सातारा जिल्ह्याा सैनिकांचा जिल्हा अशीदेखील एक ओळख आहे.यातील बहुतांश घरातून एखादा तरी मुलगा सैन्यात असतोच अशाच या साताऱ्या जिल्ह्यातील चांदवडी गावातील अजिंक्यची या मालिकेत कथा पाहायला मिळत आहे.त्यामुळे तो त्याच्या आजीच्या घरी लहानाचा मोठा झालेला असतो.अजिंक्यचे केवळ एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करायची. पण यासाठी अजिंक्यच्या घरातल्यांचा विरोध आहे. त्याच्या मामा-मामीची एकुलती एक मुलगी जयश्रीशी अजिंक्यचे लग्न व्हावे अशी घरातल्यांची इच्छा आहे. पण अनेकदा समजवूनही अजिंक्य त्याच्या स्वप्नांशी तडजोड करायला तयार नाहीये.तर अजिंक्यच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाची शीतल आहे. तिच्या आयुष्यात कसलेही ध्येय नाहीये. सतत हसत खेळत जगणारी शितल घरातील सगळ्यांची लाडकी आहे.