हर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 20:30 IST2018-10-16T17:57:35+5:302018-10-16T20:30:00+5:30
कलर्स मराठीवरील नवरा असावा तर असा कार्यक्रमामधील हर्षदा खानविलकर यांच्यासाठी लहानपणापासूनच नवरात्रोत्सव खूप खास आणि महत्वाचा आहे.

हर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व
कलर्स मराठीवरील नवरा असावा तर असा कार्यक्रमामधील हर्षदा खानविलकर यांच्यासाठी लहानपणापासूनच नवरात्रोत्सव खूप खास आणि महत्वाचा आहे. कारण, अनेक वर्षांपासून घरात हा उत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत एक सात्विक, आनंदमय वातावरण असत. तसेच आपण आईचा ‘अंबाबाईचा” उत्सव साजरा करतो. ज्या उत्सवाला आईचं स्वरूप आहे त्याच महत्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगळं असत तसच माझ्यासाठी देखील आहे. नवरात्रीचा उद्देश खूप महत्वाचा ठरतो. “चांगल्याचा वाईटावर विजय” हे एक ध्येय आहे आणि खूप मोठी शिकवण आहे. मुळात आपण नवरात्री साजरी करत असताना मनावर हे बिंबवत असतो कि आपल्याला वाईटावर विजय मिळवायचा आहे. खूप स्फूर्ती आणि शक्ती देणारा हा उत्सव आहे अस मला वाटत.
नवरात्रीचे नऊ दिवस माझा उपवास असतो. मी मीठ देखील खात नाही... फक्त फळ खाते.. उपाशी राहून देवापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो अस काही नाही ... मला अस वाटत नऊ दिवस एक छान वातावरण असत. आपण फलाहार आणि सात्विक खाल्ल्याने मन शांत आणि प्रसन्न राहत. सगळ्यात म्हत्वाच म्हणजे देवीचा उत्सव आहे त्यामुळे श्रुंगार आणि रंग याच खूप महत्व आहे. त्यामुळे नऊ दिवस नऊ रंग ... म्हणजे ज्यादिवशी जो रंग आहे त्या रंगाचे कपडे घालते, साडी नेसते... नवरा असावा तर असा या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही अशा नऊ स्त्रियांना बोलावले आहे ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.