सीआयडी या मालिकेतील कलाकारांना एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी मिळते इतकी मोठी रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 14:29 IST2018-01-29T08:59:52+5:302018-01-29T14:29:52+5:30
सीआयडी या मालिकेतील प्रमुख कलाकार दिवसाला किती मानधन घेतात हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सीआयडी या मालिकेतील ...

सीआयडी या मालिकेतील कलाकारांना एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी मिळते इतकी मोठी रक्कम
स आयडी या मालिकेतील प्रमुख कलाकार दिवसाला किती मानधन घेतात हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सीआयडी या मालिकेतील सगळ्याच कलाकारांचे मानधन हे प्रचंड आहे. या मालिकेत एसीपी प्रद्युमन ही भूमिका शिवाजी साटम साकारतात. शिवाजी साटम यांनी अनेक वर्षं चित्रपटात, मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्यांना सीआयडी या मालिकेने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. आज प्रेक्षक त्यांना एसीपी प्रद्युमन या नावानेच ओळखतात. शिवाजी साटम या मालिकेच्या चित्रीकरणासाठी एका दिवसाचे एक लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.
सीआयडी या मालिकेत सुरुवातीपासून प्रेक्षकांना दया ही व्यक्तिरेखा पाहायला मिळाली आहे. ही व्यक्तिरेखा दयानंद शेट्टी हा साकारत असून त्याची ही पहिलीच मालिका आहे. दयाला खरे तर खेळात रस होता. पण खेळताना दुखापत झाल्यामुळे खेळाडू बनण्याचा विचार त्याने सोडून दिला आणि तो अभियक्षेत्राकडे वळला. दयाने गेल्या अनेक वर्षांत जाहिरातींमध्ये, मालिकांमध्ये, रिअॅलिटी शो, चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॉनी गद्दार, रन वे, सिंघम रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तर गुटर गूँ या मालिकेत खतरो के खिलाडी, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये तो झळकला आहे. पण आजही त्याची ओळख ही इन्सपेक्टर दया हीच आहे. दयाला सीआयडीच्या चित्रीकरणासाठी एका दिवसाचे ८० हजार ते एक लाख रुपये मिळतात अशी माहिती नुकतीच इंटरनेटवर व्हायरल झाली आहे
सीआयडीमधील इन्पेक्टर अभिजीत देखील प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. त्याला सीआयडी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी एका दिवसाचे जवळजवळ ८० हजार रुपये मिळतात तर फॅड्रिक्सची भूमिका साकारणाऱ्या दिनेश फडणीसला ७० हजार रुपये मिळतात आणि डॉ. साळुंकेची भूमिका साकारणाऱ्या नरेंद्र गुप्ताला ४० हजार रुपये मिळतात.
सीआयडी या मालिकेने छोट्या पडद्यावर नुकताच एक इतिहास रचला आहे. या मालिकेचे नुकतेच २० वर्षं पूर्ण झाले आहेत. कोणत्याही मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची छोट्या पडद्यावरची ही पहिलीच वेळ आहे.
Also Read : सीआयडी मालिकेच्या टीमने रचला हा इतिहास