​क्रितिका कार्मा प्रेम या पहेली - चंद्रकांता या मालिकेसाठी शिकतेय हिंदी आणि उर्दू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 14:03 IST2017-02-27T08:33:50+5:302017-02-27T14:03:50+5:30

प्रेम या पहेली - चंद्रकांता या मालिकेत क्रितिका कार्मा चंद्रकांता ही प्रमुख भूमिका साकारत आहे. चंद्रकांता ही मालिका नव्वदीच्या ...

Kristika Karma Prem jigsaw - Chandrakanta teaches Hindi and Urdu for this series | ​क्रितिका कार्मा प्रेम या पहेली - चंद्रकांता या मालिकेसाठी शिकतेय हिंदी आणि उर्दू

​क्रितिका कार्मा प्रेम या पहेली - चंद्रकांता या मालिकेसाठी शिकतेय हिंदी आणि उर्दू

रेम या पहेली - चंद्रकांता या मालिकेत क्रितिका कार्मा चंद्रकांता ही प्रमुख भूमिका साकारत आहे. चंद्रकांता ही मालिका नव्वदीच्या दशकात खूप गाजली होती. त्यामुळे या मालिकेसोबत नव्या चंद्रकांता या मालिकेची तुलना होणार याची चांगलीच कल्पना सगळ्यांना आहे. या मालिकेची कथा ही केवळ चंद्रकांतासारखी असून या मालिकेच्या पटकथेत खूप बदल करण्यात आला आहे. या मालिकेवर सध्या या मालिकेची टीम खूपच मेहनत घेत आहे. क्रितिका कार्मा तिची भूमिका चांगली व्हावी यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीये. आपली वेशभूषा, रंगभूषा, देहबोली यात कोणतीच कमतरता पडू नये यासाठी ती सगळ्या गोष्टींवर खूप मेहनत घेत आहे. ती या मालिकेसाठी सध्या हिंदी आणि उर्दूचे धडेदेखील घेत आहे. याविषयी कृतिका सांगते, "एक कलाकार म्हणून चंद्रकांता ही भूमिका साकारणे हे माझ्यासाठी कठीण नाही. पण या मालिकेतील संवाद म्हणणे मला खूप कठीण जात आहे. कारण या मालिकेत चंद्रकांता ही व्यक्तिरेखा अतिशय शुद्ध भाषेत बोलते असे दाखवण्यात आले आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला शुद्ध भाषा बोलण्याची सवय नसते. अनेकवेळा हिंदी बोलतानादेखील आपण इंग्रजी शब्दांचा वापर करतो. त्यामुळे संवाद म्हणताना हिंदी आणि उर्दूचे शब्द आले की मला खूप टेन्शन येते. मला शब्दांचे उच्चार करणे खूपच कठीण जाते. त्यामुळे मी उर्दू आणि हिंदी भाषेतील शब्दांच्या उच्चाराचा दररोज सराव करत आहे. चित्रीकरणादरम्यानदेखील मी मिळत असलेल्या रिकाम्या वेळात या भाषेतील शब्दांच्या उच्चाराची प्रॅक्टिस करत असते. तसेच मोबाइल फोनमध्ये हिंदी भाषांतराचे एक अॅप मी डाऊनलोड केले आहे. त्यामुळे शब्दांचे अर्थ आणि उच्चार समजून घेण्यास मला मदत होते. 

Web Title: Kristika Karma Prem jigsaw - Chandrakanta teaches Hindi and Urdu for this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.