चाहूल २ च्या सेटवर कोजागिरी पौर्णिमा दणक्यात साजरी झाली !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 14:52 IST2017-10-06T09:22:57+5:302017-10-06T14:52:57+5:30
कलर्स मराठीवरील चाहूल २ च्या सेटवर काल कोजागिरी पौर्णिमा दणक्यात साजरी झाली., मालिकेमधील सगळेच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण ...
.jpg)
चाहूल २ च्या सेटवर कोजागिरी पौर्णिमा दणक्यात साजरी झाली !
लर्स मराठीवरील चाहूल २ च्या सेटवर काल कोजागिरी पौर्णिमा दणक्यात साजरी झाली., मालिकेमधील सगळेच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीम यामध्ये सहभागी झाले होते. सेटवर फॅन्सीड्रेस स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. या मध्ये केतकी पालव म्हणजेच राणी हम दिल दे चुके सनम मधील ऐश्वर्या राय तर अक्षर कोठारी सर्जा आवारा चित्रपटामधील राज कपूर बनला होता, रेश्मा शिंदे शांभवी कूछ कूछ होता मधील अंजली तसेच तारका म्हणजेच रेवा माधुरी दीक्षित बनली, भक्ती रत्नपारखी दबंग सिनेमातील सोनाक्षी बनली होती. कलाकारांनी सेटवर एकत्र येऊन खाद्यपदार्थ आणि मसाले दूध देखील बनवले होते विशेष म्हणजे हे मसाले दूध आपल्या लाडक्या अक्षरने बनवले होते.
या कोजागिरीच्या पार्टीमध्ये सर्व युनिटने मिळून सेल्फी काढला, एकत्र डान्स केला. नेहेमीच्या रुटीनमधून जरा वेगळेपणा आणि उत्साह सेटवर निर्माण झाला. सर्जाचा रोल साकारत असलेला अक्षर कोठारी हा वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. अक्षय साहेबरावच्या लुकमध्ये अगदीच वेगळा दिसतो आहे. या लूकमध्ये अक्षर पगडी, जॅकेट, कुर्ता, धोतर आणि कपाळावर लाल टिळा अशा रंगभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. साहेबराव आणि सर्जा यांच्या राहणीमानात, त्यांच्या कपड्यात आणि बोलण्याच्या पद्धतीत फरक असला तरी या दोघांचे चेहरे मात्र अगदी सारखे आहेत.
ALSO READ : चाहूल २ मालिकेमध्ये सर्जाचा चेहराच उलघडणार वाड्यातील रहस्य
काही दिवसांपूर्वी सर्जाच्या सेटवर अक्षर कोठारीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. अक्षरने त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबीयांसोबत साजरा न करता त्या दिवशी देखील या मालिकेचे चित्रीकरण केले होते.