Throwback: 20 वर्षांनंतर कुठे आहे ‘चित्रहार’ या सदाबहार शोची होस्ट तराना राजा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 08:00 IST2019-11-17T08:00:00+5:302019-11-17T08:00:02+5:30
आज कुठलेही गाणे बघायचे ऐकायचे असेल तर युट्यूब आहे. वेगवेगळ्या अॅप्स आहेत. पण हे सगळे नव्हते त्या काळात सगळ्या हक्काचा आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे चित्रहार

Throwback: 20 वर्षांनंतर कुठे आहे ‘चित्रहार’ या सदाबहार शोची होस्ट तराना राजा?
टीव्हीच्या सुरुवातीच्या काळात अनेक कार्यक्रमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजही हे कार्यक्रमाच्या स्मृती प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. दूरदर्शनवरच्या अनेक मालिका, अनेक शो प्रचंड लोकप्रिय झालेत. यापैकी एक शो म्हणजे चित्रहार. आज कुठलेही गाणे बघायचे ऐकायचे असेल तर युट्यूब आहे. वेगवेगळ्या अॅप्स आहेत. पण हे सगळे नव्हते त्या काळात सगळ्या हक्काचा आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे चित्रहार. दर शुक्रवारी प्रसारित होणा-या या गाण्यांच्या सदाबहार शोने प्रेक्षकांना वेड लावले होते. 2001 ते 2004 या काळात तराना राजा ही हा शो होस्ट करायची. आज आम्ही याच तराना राजाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
दिल्लीत 1977 मध्ये जन्मलेली तराना मुंबईत लहानाची मोठी झाली. खरे तर तरानाला एमबीए करायचे होते. पण अचानक तिच्या कुण्या एका मित्राने रेडिओतील जॉबबद्दल तिला सांगितले आणि तराना आॅडिशन द्यायला पोहोचली. खास म्हणजे, तरानाला हा जॉबही मिळाला. यानंतर तिला अनेक शो होस्ट करण्याची संधी मिळाली.
साहजिकच तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. टीव्ही अनेक जाहिरातींमध्येही ती झळकली. तरानाचे कुरळे केस,बोलण्याची स्टाईल अशी काही खास होती की, तिला चित्रहार हा कार्यक्रम होस्ट करण्याची संधी मिळाली. या शोने तिला एक वेगळी ओळख दिली.
पुढे तर तराना चित्रपटांतही झळकली. पाच चित्रपटांत तिने काम केले. प्यार के साईड इफेक्ट, लागा चुनरी में दाग, थोडा प्यार थोडा मॅजिक, कार्तिक कॉलिंग कार्तिक या सिनेमात ती झळकली. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोडी ब्रेकर्स’ या सिनेमातही तिने काम केले. ही तराना आज कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ती आजही अॅक्टिंगच्या दुनियेत अॅक्टिव्ह आहे.