संग्रामने केले वजन कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 15:16 IST2016-03-19T22:16:52+5:302016-03-19T15:16:52+5:30

        तुमच्यासाठी काय पण.... या डायलॉगमुळे तमाम तरुणांचा लाडका झालेला संग्राम साळवी आता नव्या भुमिकेत अन ...

Kneeling Weight Loss | संग्रामने केले वजन कमी

संग्रामने केले वजन कमी


/>        तुमच्यासाठी काय पण.... या डायलॉगमुळे तमाम तरुणांचा लाडका झालेला संग्राम साळवी आता नव्या भुमिकेत अन नवी डायलॉगबाजी करायला तयार झाला आहे. संग्रामने एका भुमिकेसाठी चक्क १८ किलो वजन कमी केले आहे. यासंदर्भात सीएनएक्स सोबत बोलताना संग्राम म्हणाला, प्रमुख भुमिकेतून प्रेक्षकांसमोर आल्यानंतर आता मला एक निगेटिव्ह भुमिका साकारायची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करावे असे मला वाटल्याने मी लगेच तो रोल स्वीकारला. प्रेक्षकांनी मला प्रमुख भुमिकेमध्ये पाहिल्यानंतर आता निगेटिव्ह भुमिकेत स्वीकारतील का ही भीती नक्कीच होती. काहीतरी चॅलेंजिंग करावे म्हणुन मी आता खलनायकाच्या भुमिकेत येत आहे. या भुमिकेसाठी मी १८ किलो वजन कमी केले आहे. आता वजन कमी केलेला व्यक्ती खलनायकाच्या भुमिकेत मॅच होईल का असे वाटत असेल तर ते साफ चुकिचे आहे, खलनायक हा फक्त शरीराने बळकट असतो असे नाही तर हा व्हीलन डोक्याने, मनाने, विचाराने विकृत आहे. आता पाहुयात आपण कि हा व्हीलन प्रेक्षकांना किती भावतोय ते. 

Web Title: Kneeling Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.