चाहूल या मालिकेतील ​लिसान कोणाच्या प्रेमात पडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 17:14 IST2016-12-12T12:07:28+5:302016-12-12T17:14:23+5:30

चाहुल या मालिकेत रशियातील अभिनेत्री लिसान प्रमुख भूमिका साकारत आहे. मराठी मालिकेत कोणत्याही परदेशी अभिनेत्रीने भूमिका साकारण्याची ही पहिलीच ...

Kiss Lynn in love with whom? | चाहूल या मालिकेतील ​लिसान कोणाच्या प्रेमात पडली?

चाहूल या मालिकेतील ​लिसान कोणाच्या प्रेमात पडली?

हुल या मालिकेत रशियातील अभिनेत्री लिसान प्रमुख भूमिका साकारत आहे. मराठी मालिकेत कोणत्याही परदेशी अभिनेत्रीने भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. लिसान ही मुळची रशियाची असल्याने तिला भारतीय मसालेदार पदार्थ खाण्याची सवय नाहीये. ती नेहमी उकडलेल्या भाज्या आणि उकडलेले चिकन खाते. हे उकडलेले पदार्थ म्हणजे तिचा जीव की प्राण आहेत. त्यामुळे ती कधीच दुसरे कोणतेही पदार्थ चाखूनदेखील पाहात नाही. पण नुकतेच तिने आपले मराठमोळे पदार्थ खाल्ले आणि ती आता ती या पदार्थांच्या अक्षरशः प्रेमात पडली आहे. 
या मालिकेच्या प्रोमोचे चित्रीकरण नुकतेच साताऱ्याजवळील वाई येथे करण्यात आले. साताऱ्यातील जेवण हे अतिशय मसालेदार पण चविष्ट असते. त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी या मसालेदार पदार्थावर ताव मारला होता. त्यामुळे त्यांना सगळ्यांना हे पदार्थ अतिशय आवडीने खाताना पाहून लिसालादेखील हे पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण झाली. आपणदेखील मसालेदार पदार्थ खावेत असे तिला वाटत असल्याने तिने मस्त मसालेदार पदार्थावर ताव मारली. पण आयुष्यात कधीच उकडलेल्या पदार्थाशिवाय कोणतेही पदार्थ खाण्याची सवय नसल्याने हे मसालेदार पदार्थ खाल्यावर तिला चांगलाच ठसका लागला. लिसानला काही त्रास होतोय का याची चिंता सगळ्यांनाच लागली होती. पण थोडेसे पाणी प्यायल्याने तिला बरे वाटले. त्यामुळे सगळ्यांचे टेन्शन दूर झाले. तिने नव्याने चाखलेले हे पदार्थ तिला खूपच आवडले. आता तर ती अस्सल मराठमोळ्या जेवणाच्या प्रेमात पडली आहे. सध्या ती तिच्या उडकलेल्या पदार्थांसोबत हे पदार्थदेखील काही वेळी चाखते.  

Web Title: Kiss Lynn in love with whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.