किश्वर मर्चंटच्या पायाला दुखापत; फोटो शेअर करीत म्हटलं, ‘खूप दुखतंय’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 18:22 IST2017-09-06T12:51:44+5:302017-09-06T18:22:01+5:30
टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंट-जॉर्डन एका फिटनेस आणि हेल्थच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या अपघातात जखमी झाली आहे. तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, ...
.jpg)
किश्वर मर्चंटच्या पायाला दुखापत; फोटो शेअर करीत म्हटलं, ‘खूप दुखतंय’!
टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंट-जॉर्डन एका फिटनेस आणि हेल्थच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या अपघातात जखमी झाली आहे. तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, याबाबतचा एक फोटो तिने ट्विटर हॅण्डलवर शेअर केला आहे. फोटोमध्ये किश्वरचा जखमी पाय दिसत असून, त्याला प्लॅस्टर लावलेले आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये किश्वरने लिहिले की, ‘ते म्हणतात की, आयुष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला हवा. मी पण याचा विचार केला, पायाचे हाड तुटल्यानंतर कसे वाटते त्याचा मी सध्या अनुभव घेत आहे.’ किश्वरचे हे ट्विट मस्तीच्या मूडमधील आहे. तिने आणखी एक ट्विट केले असून, त्यामध्ये लिहिले की, ‘ही गोष्ट खूपच बोअरिंग आणि अन्कम्फर्टेबल आहे. अशात मी तीन आठवडे कशी सर्वाइव्ह करणार?’ किश्वरच्या या ट्विट्सला तिच्या चाहत्यांकडून हजारोंच्या संख्येने लाइक्स आणि कॉमेण्ट मिळत आहेत.
सध्या किश्वरला डॉक्टरांनी कम्पलीट बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या ती कुठल्याच अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेताना दिसत नाही. ३६ वर्षीय किश्वर मर्चंट ‘प्यार की ये एक कहानी, एक हसीना थी, कैसी ये यारियां आणि बिग बॉस’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये झळकली आहे. किश्वरने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सुयश रॉयबरोबर लग्न केल्यानेही ती चर्चेत आली होती. किश्वर आणि सुयश डिसेंबर २०१६ मध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह बंधनात अडकले होते.
They say u shud experience everythg once in ur life .. I decided to experience what a fracture feels like !!! #willbebackstronger !!! ✌️ pic.twitter.com/Erjtfjc8DC— Kishwer M Rai (@KishwerM) September 4, 2017
तब्बल सात वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर हे जोडपे विवाह बंधनात अडकले. जेव्हा या दोघांचे लग्न झाले तेव्हा किश्वरचे वय ३५, तर सुयशचे वय २७ वर्ष होते. दोघांच्या वयामध्ये आठ वर्षाचे अंतर असले तरी, दोघांची जोडी खूपच शोभून दिसते. किश्वरने टीव्ही जगतात दूरदर्शनवरील सर्वात प्रसिद्ध ‘शक्तिमान’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तिने अल्पावधीतच टीव्ही जगतात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये येण्याचीही तिची तयारी सुरू आहे.