किंग खान शाहरुख खानने सलमान अलीला केली गाणं म्हणण्याची विनंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 20:00 IST2018-12-23T20:00:00+5:302018-12-23T20:00:02+5:30
जेव्हा शाहरुख खान त्याच्या ‘झिरो’ या चित्रपटातील कलाकारांबरोबर ‘इंडियन आयडॉल १०’च्या ग्रँड फिनालेमध्ये विशेष पाहुणा म्हणून आला होता. सलमान एक उदयोन्मुख गायक आहे आणि त्याचा साधेपणा आणि गाण्यातील कौशल्यामुळे तो सर्वांनाच आवडतो.

किंग खान शाहरुख खानने सलमान अलीला केली गाणं म्हणण्याची विनंती!
आपण नेहेमीच बघितलं आहे की, एखाद्या चाहत्याने बॉलिवूड सेलिब्रिटीला एखादी डान्स स्टेप करून दाखवण्याची किंवा एखादा प्रसिद्ध संवाद म्हणून दाखवण्याची विनंती केली आहे. पण असं क्वचितच दिसतं की, एक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या चाहत्याला काहीतरी करून दाखवण्याची विनंती करेल. ‘इंडियन आयडॉल १०’चा स्पर्धक असलेल्या सलमान अलीला असाच अनुभव आला जेव्हा शाहरुख खान त्याच्या ‘झिरो’ या चित्रपटातील कलाकारांबरोबर ‘इंडियन आयडॉल १०’च्या ग्रँड फिनालेमध्ये विशेष पाहुणा म्हणून आला होता. सलमान एक उदयोन्मुख गायक आहे आणि त्याचा साधेपणा आणि गाण्यातील कौशल्यामुळे तो सर्वांनाच आवडतो. ह्या कार्यक्रमामध्ये आलेल्या जवळपास प्रत्येक सेलिब्रिटीने सलमानच्या गाण्याचं कौतुक केलं आहे.
सलमान अलीच्या शानदार कामगिरीनंतर शाहरुख खानने त्याच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील आवडतं गाणं ‘सजदा’ गावून दाखवण्याची विनंती केली. जरी किंग खानने मान्य केलं की, त्याला टिव्ही बघायला जास्त वेळ मिळत नाही तरी त्याने सलमानला गाणं म्हणताना ऐकलं आहे. त्याने ज्याप्रकारे गाणं म्हटलं ते शाहरुखला खूप आवडलं म्हणून त्याने ते गाणं लाईव्ह ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. शाहरुखने या होतकरू गायकाची मुक्तपणे प्रशंसा केली आणि ‘सजदा’ या गाण्याचं लिपसिंक सुद्धा केलं. तो विनोदाने म्हणाला की, त्याला सलमानचं कौतुक करण्याची संधी खूपच जास्त वेळा मिळते. नंतर सलमानने शाहरुखला सांगितलं की, ‘सजदा’ हे गाणं त्याच्यासाठी खूप विशेष आहे. कारण इंडियन आयडॉलच्या प्रवासाची सुरुवात करताना त्याने हे गाणं ऑडिशनमध्ये म्हटलं होतं म्हणून हे गाणं त्याच्यासाठी खूप लकी आहे. म्हणून अंतिम भागात आपल्या आवडत्या नटासमोर गाणं सादर करणं हा सलमान अलीसाठी सर्वोत्तम क्षण होता.