‘खतरों के खिलाड़ी-8’ ’ वा सिझन रोहित शेट्टी करणार होस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 13:32 IST2017-04-10T08:02:15+5:302017-04-10T13:32:15+5:30

‘खतरों के खिलाड़ी-8’ वा सिझन लवकरच सुरू होणार आहे.त्यामुळे या शोच्या होस्ट पासून ते कंटेस्टंट पर्यंत कोण कोण सेलिब्रेटी ...

'Khatron Ke Khilkar-8' 'Se Season Rohit Shetty Will Host? | ‘खतरों के खिलाड़ी-8’ ’ वा सिझन रोहित शेट्टी करणार होस्ट?

‘खतरों के खिलाड़ी-8’ ’ वा सिझन रोहित शेट्टी करणार होस्ट?

तरों के खिलाड़ी-8’ वा सिझन लवकरच सुरू होणार आहे.त्यामुळे या शोच्या होस्ट पासून ते कंटेस्टंट पर्यंत कोण कोण सेलिब्रेटी या शोमध्ये सहभागी होणार याची उत्सुकता लागली असून शोशी संबंधीत अनेक घडोमोडी सध्या चर्चेच्या विषय बनल्या आहेत. खतरों के खिलाडी हा शो राइजिंग स्टार या सिगींग रिअॅलिटी शोच्या जागेवर सुरु होणार असून यंदाच्या सिझनमध्ये टीव्हीवरील लोकप्रिय चेहरे या शोमध्ये वेगेवळे आव्हान स्विकारताना  दिसतीलल. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसचा 10 वा सिझनचा विजेता मनवीर गुजर आणि   मन्नु पंजाबी, रोहन मेहरा हे याशोमध्ये सहभागी होणार असल्याचे समोर आले होते. यांच्या पाठोपाठ आता आणखीन काही सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. रिअॅलिटीशोचा किंग प्रिंस नरूला त्याची गर्लफ्रेंड युविका चौधरीसह सहभागी होणार आहे. तर सेक्सी वुमेन इन एशिया ठरलेली निया शर्मा आणि  करण वाही हे देखील या शोमध्ये एंट्री घेणार असल्याचे कळतंय.तसेच अभिनेत्री रिमी सेनही या शोचा भाग असणार असल्याचेही बोलले जात आहे.याआधी बिग बॉसच्या 9 व्या सिझनमध्ये रिमी सेन झळकली होती.यंदाचा सिझन हा  खिलाडी अक्षय कुमारने होस्ट करावा अशा अनेक रसिकांची इच्छा असली तरी रोहित शेट्टी पुन्हा एकदा हा शो होस्ट करताना दिसणार असल्याचे कळतंय. अक्षय कुमारनंतर रोहित शेट्टीला या शोमध्ये जास्त पसंती मिळाली होती त्यामुळे दुस-यांदा रोहित शेट्टी हा शो होस्ट करणार आहे. गेल्या सिझनमध्ये अर्जुन कपूरने हा शो होस्ट केला होता. त्यामुळे यंदाचा हा सिझन  इतर सिझनपेक्षाही दमदार असणार हे मात्र नक्की.        

Web Title: 'Khatron Ke Khilkar-8' 'Se Season Rohit Shetty Will Host?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.