Khatron Ke Khiladi Season 8:हिना खानचा हा व्हिडीओ बघताच तुमचीही होईल बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 13:18 IST2017-07-10T07:48:43+5:302017-07-10T13:18:43+5:30

दिलेला टास्क पूर्ण केला तर त्यातून मिळणारे समाधानही खूप वेगळे असते जे शब्दातही व्यक्त करू शकत नसल्याचे खुद्द हिनाने आपले मत व्यक्त केले आहे.

Khatron Ke Khiladi Season 8: Seeing Hina Khan's video will be yours too | Khatron Ke Khiladi Season 8:हिना खानचा हा व्हिडीओ बघताच तुमचीही होईल बोलती बंद

Khatron Ke Khiladi Season 8:हिना खानचा हा व्हिडीओ बघताच तुमचीही होईल बोलती बंद

'
;ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अक्षराचा एक नवा अंदाज रसिकांना पाहायला मिळतोय. मालिका सोडल्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी अक्षरा म्हणजेच हिना खान पुन्हा एकदा 'खतरों के खिलाडी 8' व्या पर्वात झळकत आहे.नेहमी आदर्श सून बनत हिनाने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. मात्र आता हिना खान सध्या बेधक अंदाजात रसिकांचे मनोरंजन करत आहे. 'खतरों के खिलाडी'च्या आगामी भागात तुम्हाला हिना खान एक खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. हा स्टंट पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.होय,रोहित शेट्टीने हिनाला एक जबरदस्त टास्क दिलाय यांत तिला न थांबता एक  गाणं गात गळ्यात भला मोठा अजगर लटकवायचा होता. त्यानुसार व्हिडीओत दुस-या शॉटमध्ये ती हवेत उडताना दिसतेय,तर दिस-या शॉटमध्ये ती किड्यांवर चालताना दिसतेय. दिलेल्या टास्कनुसार हिनाने मोठ्या धाडसाने हे टास्क स्विकारलेही.खुद्द हिनानेच तिच्या खतरनाक स्टंट टास्कचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघताच तुमच्याही अंगावर काटा नाही उभा राहिला तरच नवल.यापूर्वी कधीही असे स्टंट केले नव्हते.या कार्यक्रमाची कंसेप्ट पाहाता प्रत्येक कंटेस्टंटला असे खतरनाक स्टंट करावे लागत असले तरीही हे चॅलेंज पूर्ण करू शकतो किंवा नाही याचे सतत दडपण असते. मात्र दिलेला टास्क पूर्ण केला तर त्यातून मिळणारे समाधानही खूप वेगळे असते जे शब्दातही व्यक्त करू शकत नसल्याचे खुद्द हिनाने आपले मत व्यक्त केले आहे. येत्या 22 जुलैपासून तुम्ही हे सगळे खतरनाक स्टंट कलर्स चॅनलवर रात्री 9 वाजता 'खतरों के खिलाडी 8 पर्व' पाहू शकता,हिना खान खतरों के खिलाडीच्या फायनल राऊंडपर्यंत पोहचली अाहे. नुकतेच हिना तिच्या या भागाचे शूटिंग पूर्ण करून मुंबईतही परत आली आहे.त्यामुळे 22जुलैपासून प्रसारित होणा-या भागात तुम्हाला हिनाचा हा बेधडक अंदाज पाहणे रंजक ठरणार आहे.हिनासह रवि दुबे,निया शर्मा,शाईनी दोसी,शांतनु माहेश्वरी,मोनिका डोंगरा,गीता फोगाट, लोपामुद्रा राऊत, करन वाही,मनवीर गुर्जर आणि रित्विक धन्जनी यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
 
 

Web Title: Khatron Ke Khiladi Season 8: Seeing Hina Khan's video will be yours too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.