रख्सार रेहमान म्हणते, मुलांसोबत संवाद साधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 10:02 IST2018-05-30T04:32:28+5:302018-05-30T10:02:28+5:30

‘मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका छोटी मुलगी मरियम आणि तिच्या ...

Kharsar Rehman says, communicate with the kids | रख्सार रेहमान म्हणते, मुलांसोबत संवाद साधा

रख्सार रेहमान म्हणते, मुलांसोबत संवाद साधा

रियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका छोटी मुलगी मरियम आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घटनांवरील तिच्या दृष्टिकोनाची गोष्ट आहे.या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे आई आणि मुलीचे नाते म्हणजे मरियम आणि तिची आई ऊर्फ रूख्सार रेहमान यांच्यामधील नाते.

रूखसार यांची व्यक्तिरेखा मदीहा ही एक शिस्तप्रिय आई असून तिला आपली मुलगी मरियम हिला शिस्त लावायची आहे. खऱ्या आयुष्यातही रूख्सार यांना मुलगीच आहे. आई मुलीच्या नात्याबद्दल रूखसार म्हणाल्या, “पालक म्हणून आपण आपल्या मुलांसोबत संतुलन साधायला हवे यावर माझा विश्वास आहे. शिस्त राखा पण तेवढेच त्यांच्यासोबत शांतपणे आणि मैत्रीपूर्ण पद्धतीनेही वागा. कुठल्याही बाबतीतील टोकाचे वागणे हे मुलांना आक्रमक किंवा बुजरे बनवू शकते. त्यामुळे संतुलन गरजेचे आहे.”

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ ही मालिका स्टार प्लसवर नुकतीच सुरू झाली असून प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडे सात वाजता पाहायला मिळत आहे.मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान या दिग्गज कलाकारांची मातृभाषा उर्दू असल्याने त्यांनी ती मालिकेतील अन्य कलाकारांना या मालिकेसाठी ही भाषा शिकविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान हे जुन्या नबाबी घराण्यातील असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची मातृभाषा उर्दू दाखविण्यात आली आहे. या मालिकेची कथा ही खूप वेगळी असल्याने अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह मालिकेत नऊ वर्षांची चिमुरडी देशना दुगड मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. भोपालच्या पार्श्वभूमीवर या मालिकेची कथा असून या मालिकेपूर्वीही देशनाने 'इस प्यार को क्या नाम दूँ' आणि 'बाल कृष्ण' या मालिकेत काम केले आहे.

Web Title: Kharsar Rehman says, communicate with the kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.