"राजकारणी याहुन जास्त उर्मटपणा..." KBC मधील इशित भट्टच्या वागण्यावर अभिनेत्यानं थेट मत मांडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 10:21 IST2025-10-17T10:21:29+5:302025-10-17T10:21:53+5:30
"राजकारणी याहून जास्त उर्मटपणा करतात" KBC मधील वादावर स्वप्नील राजशेखर म्हणाले "हा तर लहान मुलगा"

"राजकारणी याहुन जास्त उर्मटपणा..." KBC मधील इशित भट्टच्या वागण्यावर अभिनेत्यानं थेट मत मांडलं
Kbc Ishit Bhatt’s Rude Behaviour Controversy: गेल्या काही दिवसांपासून 'कौन बनेगा करोडपती' (KBC) मध्ये सहभागी झालेला १० वर्षीय स्पर्धक इशित भट्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हॉटसीटवर बसलेल्या इशितने महानायक अमिताभ बच्चन यांना दिलेली उलट उत्तरे आणि त्याचा अति आत्मविश्वास चाहत्यांना खटकला आहे. इशितवर आणि त्याच्या पालकांवर सतत टीका होत असतानाच, मराठी अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी या संपूर्ण प्रकरणावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
स्वप्नील राजशेखर यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, इशितचा 'आगाऊपणा' हा केवळ त्याचे वैयक्तिक वर्तन नसून, त्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. स्वप्नील यांनी लिहलं, "अजुन विषय ताजा आहे…. तर मी ही बोलुन घेतो... एकतर शोची Creative Team या सगळ्या मुलांना रीतसर Brief करते... मुलांना माफक आगाऊपणे बच्चनसाहेबांना काहीतरी उत्तरं द्यायला सांगीतलं जातं… त्यांचा आगाऊपणा आणि त्यावरची बच्चनसाहेबांची प्रतिक्रीया हे कार्यक्रमात Humour आणतात... यापुर्वी आणि आतासुध्दा लहान मुलांचे सगळे एपीसोडस Trp च्या दृष्टीने यशस्वी झाले आहेत. अनेक मुलांनी यापुर्वीही थोडाफार आगाऊपणा तिथे केलाय... पण तो Smartness, Cuteness च्या सीमारेषेवर राहीला. हा जो भट मुलगा आहे त्यालाही त्याचा ओवर स्मार्टनेस पाहुन आधी प्रोत्साहन दिलं गेलंय हे नक्की. पण हा मुलगा वहावत गेला. एकतर Hot Seat वर येणं आणि पहिले काही प्रश्न सोपे येणं यातुन त्याचा आगाऊपणा उर्मटपणात बदलला.. शिवाय Creative Team कडून आधीच मिळालेलं प्रोत्साहन, या सगळ्याचा परिणाम दिसला".
इशितच्या वागण्याबद्दल बोलताना बालमानसशास्त्रज्ञांनी त्याला ADHD syndrome (अटेंशन डेफिसिट हायपरॲक्टिव्हिटी डिसऑर्डर) असण्याचे निदान केले आहे. यावर स्वप्नील राजशेखर यांनी यात आणखी एक मुद्दा जोडला. त्यांनी लिहलं, "या मुलाला ADHD Syndrome असण्याबाबत बालमानसशास्त्रज्ञानी केलेलं निदान योग्य आहेच. शिवाय माझ्या अंदाजाने त्याला अजुन एक Syndrome आहे. 'शिनचॅन सिंड्रोम'. "सवाल तो पुछो" "ऑप्शन तो बताओ" हा जो त्याचा सूर आहे तो त्या शिनचॅन नामक महाआगाऊ, उर्मट आणि लहान मुलात लोकप्रिय अशा कार्टून मुलाचा सूर आहे. शिनचॅन पाहात मोठी झालेली मुलं साधारणपणे याच छापाचं बोलतात. याची जबाबदारी अर्थात पालकांची असते".
इशितवर होणाऱ्या अती टीकेवर स्वप्नील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "थोडक्यात, मुलगा मुळचा आगाऊ असेल, Single Child असल्यामुळे Over Pampered असेल, सिंड्रोमग्रस्त असेल पण त्याच्या वर्तणुकीवर उल्लेखीत ईतरही घटक कारणीभूत आहेत… आधीच मर्कट तशात मद्य प्याला, तशात वृश्चिक दंश झाला… असं झालंय त्याचं... बरं पहिली जी मिनीटभराची एडीटेड क्लिप वायरल झाली, त्याने या मुलाबद्दल संतापाची जोरदार लहर निर्माण केली. पण सोशल मिडीयावर जो पुर्ण लांबीचा व्हिडीओ आहे, तो पाहील्यावर या मुलाचा 'तेवढा' राग येत नाही…. हे सुध्दा बोलकं आहे. आणि एक, सोनी लिवने त्या एपिसोडमधून या मुलाचा भाग संपुर्ण काढलाय. पण Thumbnail याच मुलाचा ठेवलाय. अशी मजा…. तस्मात, देशाने त्याला सोडावं आता.. झालं तेवढं पुरे झालं.. अतीच हेटाळणी झाली त्याची… अनेक राजकारणी याहुन जास्त उर्मटपणा रोज करतात, आपलाच पैसा लाटुन आपल्यालाच माज दाखवत फिरतात.. त्यांचं काय करतो आपण ? हा तर लहान मुलगा आहे", असं मत स्वप्नील राजशेखर यांनी मांडलं.